रविवार, ३१ जुलै, २०११

आम्ही पाहिलेला सेशेल्स देश


      माझे पती लेफ्ट. कमांडर शिशिर दीक्षित हे आपल्या भारतीय नौसेनेमध्ये अधिकारी आहेत. त्यांची सेशेल्स या देशाचा 'तटरक्षकाचा सल्लागार' म्हणून नियुक्ती झाली. त्यामुळे सर्व प्रथम तर हा देश कुठे आहे? तिथे कसे जायचे? असे अनेक प्रश्न मनात येत होते. तर माहिती मिळाल्यावर असे कळले की, हा देश आफ्रिका खंडाच्या किंवा केनियाच्या बाहेरच्या बाजूस ११५ बेटांनी बनलेला देश आहे. तेथील 'माहे' या नावाचे सर्वात मोठे २६ * ८ किमि. चे बेट आहे. याची राजधानी 'व्हिक्टोरिया'ही आहे. या देशात आधी फ्रेंच्यांच्या वसाहती होत्या. नंतर अनेक वर्षे ब्रिटीशांनी आपला जम बसवला होता. १९७६ रोजी हा देश स्वतंत्र झाला.

      असे मानले जाते की, हा देशा म्हणजे पुर्वी 'सोमालियन' चाचेगिरांचा लपायचा आड्डया होता. त्यामुळे या देशाला या चाचेगिरांपासून धोका होता. म्हणून तिथे तटरक्षकाची भूमिका अधिकच प्रबळ बनली.

      या देशाच्या इतिहासाचा संबंध भारत देशाशी जोडला आहे, असे मानतात.  तेथील काही स्थानिक लोकांचे मत आहे की, त्यावेळी 'राम-रावण' युद्धात लक्षुमन मुर्च्चित होऊन पडला, त्यावेळी हनुमान हिमालयातून 'संजीवनी बुटी' असलेला 'द्रोणागिरी' पर्वत उचलून आणत होता. तर या पर्वता पासून काही भाग खाली समुद्रात पडला. तर हा सर्व भाग मिळून काही बेट तयार झाली. हा सेशेल्स देशही त्याचाच भाग आहे, असे मानण्यात येते. त्यमुले येथील वनस्पती औषधी असल्याचेही समजते. येथे एकही विषारी प्राणी किंवा विषारी जीव-जंतू नाहीत.
     
      येथील स्थानिक लोकं त्या देशाचे पर्यावरण जपण्यासाठी नेहमी जागरूक असतात. या देशात बाहेरून आलेल्या कोणत्याही प्रण्याला किंवा पक्षाला थारा दिला जात नाही. एवढेच काय तर इतर देशातील वनस्पती देखील येथे चालत नाही.
   
      ही बेटे जरी विषुववृत्ताच्या जवळ असली, तरी तिथे अतिशय उष्ण हवामान नसते. येथे पावसाचे प्रमाण देखील अधिक आहे. त्यामुळे सर्वत्र हिरवेगार आणि हवा देखील कायम ताजी असते. अतिशय सुंदर आणि भरपूर निसर्ग संपन्न असा हा देश आहे.

      येथील रस्ते देखील चांगले आहेत. शिवाय नेहमी स्वच्छ असतात. तिथे सपाट भागात सर्व उद्योग-व्यवसाय चालतात. म्हणजेच शाळा, कॉलेजेस, ओफीसेस,दुकाने, इ. आहेत. तर डोंगराळ भागात लोकांची वस्ती आहे. या देशात एकच 'नॅशनल हाइवे' आहे.

      या माहे बेटाच्या खालोखाल मोठी असलेली बेट म्हणजे 'प्राले' आणि  'ला दिग'.  येथे देखील भरपूर प्रमाणात निसर्ग संपत्ती आहे . यातील 'प्राले' नावाच्या बेटावर 'व्हाले-द-मै' नावाचे एक ठिकाण आहे. ते मोठ्या-मोठ्या 'पाम-ट्री' साठी प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी या झाडावर 'कोको-द-मेर' नावाचे फळ येते. याची 'बी' २० किलो असते. असे मानले जाते की, हे फळ म्हणजे 'नर-नारळ' मादा-नारळ' यांचे मिलन आहे. हे फळ खाता येत नाही आणि जर चुकुन कोणी हे खायचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती झोपून राहते. आता पुन्हा या फळाच्या इतिहासाचा आपल्या भारताच्या इतिहासाशी संबंध लावला जातो. असे मानले जाते की, आपले पूर्वीचे जे संत किंवा ऋषि मुनी कमांडळू वापरायचे. तो कमांडळू या फळापासूनच बनलेला असायचा. हे फळ जगात इतर कुठेही आढळून येत नाही. या फळाचा व्यापार करायला परवानगी नाही. एवढेच काय पण एका बेटावरून दुसर्‍या बेटावर देखील न्यायची परवानगी नाही.

      तसेच या 'पाम-ट्री' च्या पानांचा तिथील स्थायिक लोकं विविध पद्धतीने उपयोग करून घेतात. त्यांच्या घरांवरचे छत म्हणून उपयोग होतो. पावसापासून बचाव करण्यासाठी देखील उपयोग होतो.

      येथील समुद्राचा रंग देखील अतिशय मनमोहक आहे. दिवसातल्या ३ वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे रंग या समुद्राचे दिसून येतात. या ११५ बेटांपैकी काहीच बेटांवर मनुष्य वस्ती आहे. इतर काही बेटांवर १-२ रेस्टोरेंट आहेत. तर काही बेटांवर काहीच नाही. ही लहान लहान बेटे असल्यामुळे काही बाबतीत त्याना इतर मोठ्या देशांवर अवलंबुन राहावे लागते.

      असा हा आपल्या भू-तलवावरील अतिशय निसर्ग संपन्न असा देश आहे.

गुरुवार, १४ जुलै, २०११

गुरुपौर्णिमा

vyasa.jpg
     गुरुर ब्रह्मा ग्रुरूर विष्णू गुरुर देवो महेश्वरा:| गुरू: साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:||

त्या सद्गुरू मऔलींचा आभार व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा किंवा व्यासापौर्णिमा होय. असे म्हटले जाते की सत्यवतीला परशरांपासून 'श्री व्यास' हा विश्व प्रसिध्द मुलगा आषाढ शुध्द पौर्णिमेला झाला. ' शिक्षणाची व्यवस्था करतो तो व्यास' व तो ज्या उच्चासनावर बसून लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करतो, ते व्यासपीठ म्हणतात. व्यासांना जगद्गुरू व आचार्य अशा पदव्यानी विभूषीत केले आहे. प्रत्येक विषयाचा अभ्यास ग्रंथांमधून आत्मसात करून त्याचा अनुभव घेतल्यावर जनकल्यानासाठी लोकांना सांगतो त्याला 'आचार्य' म्हणतात. जन्म देणारी, सांगोपन करनारी, शिक्षण देणारी, संकटात प्राण रक्षण करणार व मोक्षाला नेणारी अशा पाच माता आहेत. त्यातील सद्गुरू ग्यान देऊन मोक्षाला नेतात म्हणून त्याना माउलि म्हणतात. सद्गुरुंचे वय,लिंग,जात व धर्म महत्वाचे नसून त्यांचा आध्यात्मिक अधिकार महत्वाचा असतो. या दिवशी सद्गुरू पूजन व दर्शनासाठी सद्गुरू स्थानी जावे व त्यांचा कार्या प्रचार करावा.