भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्रीगणेशाचा जन्म झाल्यामुळे या उत्सवाचे आयोजन प्रत्येक घरात केले जाते. 'सुखकर्ता दुःखहार्ता श्रीगणेश' चतुर्थी व्रताने प्रसन्न होतो अशी श्रद्धा आहे.
लोकमान्य टिळकांनी इ.स. १८९३ ला सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाचा प्रारंभ केला. इ. स. १८९३ ला मुंबईसह महाराष्ट्रमध्ये हिंदू-मुसलमानांचे दंगे झाले तेव्हा समाजात एकात्मता निर्माण करण्यासाठी टिळकांनी हा उत्सव सुरू केला.
श्रीगणेश मूर्ती :- आकार चरण युगुल| उकार उदर विशाल|| मकार महामंडल| मस्तकाकारे|| श्री ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीगणेशाला ओंकार स्वरुप व शब्द ब्रम्हरूप म्हटले आहे.
१. सोंड :- जमिनीवर पडलेली बारीक सुईसुद्धा हत्तीची सोंड उचलून घेते. ' जे चांगले आहे ते आत्मसात केले पाहिजे. गणपती उजव्या व डाव्या सोंडेचे असतात. उजवी सोंड म्हणजे दक्षिण दिशा 'यमाची' दिशा आहे. उजवी बाजू 'सूर्य' नाडीची आहे. यमलोकाच्या दिशेला जो तोंड देऊ शकतो तो शक्तीशाली असतो, तसेच सूर्यनाडी चालू असलेला तेजस्वी असतो. या दोन्ही आर्थि उजव्या सोंडेचा गणपती जागृत असतो. या गणेशाची पूजा कडक सोवल्यामधे केली जाते.
. डावी सोंड वाममुखी म्हणजे उत्तर दिशा, ही शुभ व अध्यात्माला पूरक आहे, आनंददाई आहे म्हणून वाममुखी गणेश पुजेमध्ये ठेवतात.
२. शीर :- धडापासून वेगळे केलेले तेच शीर परत त्या धडाला लावून भगवान शंकर गणेशाला जिवंत करू शकले असते, परंतु त्यांनी तसे न करता हत्तीचे शीर लावले कारण हत्ती सर्व प्राण्यांत बुद्धिमान आहे. भगवान शंकराने आपल्या मुलाला बुद्धिमान केले.
३. कान :- श्री गजननाचे कान सुपासारखे मोठे आहेत. सुपातून धान्य पाखडल्यावर फोलपट बाहेर फेकले जाते व उपयुक्त धान्य सुपात राहते. माणसानेही जे ऐकवायास योग्य आहे, तेवढेच ऐकावे व बाकीचे ऐकून न ऐकल्यासारखे करावे.
५. हात :- गणपतीला ४-६ हात असतात. सहा हातात सहा आयुधे आहेत. सहा हात म्हणजे सहा शास्त्रे होत.
६. मोठे पोट :- जे ऐकले ते बोलून दाखविण्याची सवय हानिकारक असते. श्रीगणेशाच्या पोटावर नागचा करगोटा असतो. नागात विष असते. टीकाकारातही टीका करण्याचे विष असते, म्हणून श्रीगणेशासारखे टीकाकारांना अलंकार म्हणून स्वीकारले पाहिजे.
७. बैठक :- अकारण फिरतो तो दुःखी होतो म्हणून श्रीगणेशाची बैठक स्थिर आहे.
चतुर्थी व्रत:- मंगळवारी येणार्या अंगराकी चतुर्थीपासून चतुर्थी उपवासाचा प्रारंभ करावा. वद्यपक्षातील संकष्टी चतुर्थीचा उपवास चन्द्रोदयानंतर सोडतात. चंद्र हे मनाची तर श्रीगणेश बुद्धिदेवता आहे. जर सद्बुद्धि मनाच्या सहवासात आली तर आपले मन अचंचल होऊन 'सयुज्जता' मुक्ती प्राप्त होते. चतुर्थीला पृथ्वीभोवती Zero-G-Belt आकर्षणरहित कडे निर्माण होते. त्यामुळे पचनक्रिया मंदावते म्हणून आरोग्याच्या दृष्टीने चतुर्थीला उपवास करणे गरजेचे आहे.