दिल्याने दारिद्र्य न येता देवत्व येते. प्रारब्ध व प्रयत्न हा प्रत्येक प्राण्याचा जीवनातील अद्वैत भाग आहे. प्रयासाने प्रसन्नता, पैसा, प्रतिष्ठा व प्रभूची प्राप्ती होते. प्रयत्नाने इच्छित ध्येयापर्यंत गेल्यावर जी अवस्था अनुभवास येते, तिला 'विजय' असे म्हणतात. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त असलेला दसरा- दश=दहा इन्द्रिये + हरा= विजय मिळविणे. आत्मशक्तीने दहा इँद्रियांवर विजय मिळवून मोहाच्या महिषासूराला मारण्याचा दिवस म्हणजे 'विजयादशमी' होय.
२. अर्जुनाने अज्ञातवास संपल्यामुळे शामीच्या झाडावर बांधून ठेवलेले आपले शस्त्र काढून विराटनगरीचा राजकुमार उत्तर याच्या रथावर आरूढ होऊन कौरवांचा पराभव केला.
३. देविने महिषासूरचा वध केला.
४. चांगल्या कार्याची सुरूवात या दिवशी केली जाते.
५. पुर्वी राजे विजय मिळविण्यासाठी या दिवशी प्रस्थान करीत.
या दिवशी ग्रंथ, शेतीची अवजारे, वापरातील भांडी, उखळ, मुसळ, व शस्त्र यांची पूजा करतात. आपत्यामुळे गॅस कमी होतो, काडकी नाहीशी होते. पावसाळयापूर्वी पेरलेले धान्य दसर्याच्या काळात परिपक्व झालेले असते म्हणून या दिवशी गोड पदार्थ खाउन बाजरीचे कनीस, आपट्याच्या पानांची फांदी, व देवघरात उगवलेले तृण-धान्य हातात घेऊन सायंकाळी ईशान्य दिशेला जाउन शमीपूजन केल्यानंतर गावातील देवाचे दर्शन करून देवाला वाहतात. आपट्याची पाने एकमेकांना वाटतात. सीमोल्लंघनावरुन आल्यावर महिला पुरुषाना ओवळतात व गहू वा तांदुळाने काढलेल्या चौकावर बसवून देविसाठी केलेल्या प्रसादाच्या पापड्या देतात. यावेळी सत्रंजीवर काढलेल्या तांदुळाच्या दोन बाहूल्यातील लपविलेले सोने शोधून काढण्याची पद्धत आहे. या दिवशी झेनडूच्या माळा घर, देवघर व वाहन यांना बांधातात.