अहो वर्तमानात जगायचं

माझे पती, कमांडर शिशिर दीक्षित, मुंबईत नौसेना अधिकारी आहेत. त्यांची नौसेनेमध्ये असल्याने वारंवार बदली होत असते. त्यामुळे त्यांच्याबरोबर मी आणि माझा मुलगा देखील जिथे जावं लागेल तिथे जात असतो. आम्ही पण या आयुष्याचा स्वीकार केला आहे.
असंच सध्या मुंबईत असल्याने इथल्या वातावरणाशी जुळवून घेत आहोत. माझ्या मुलाला (आऋुशला) क्रिकेटची खूप आवड. पण कॉलनी मधल्या इतर मुलांना इतर खेळांची आवड. मग काय करावं, असा माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. त्याला अनेक प्रकारे समजाविण्याचा प्रयत्न केला. इतर खेळ खेळावे असा. पण त्याला काही केल्या हे पटेना. मला मात्र वाटत होते, की याला इतर कुठे क्रिकेट कोचिंग लावायचे आणि बदली झाली तर... तर मधेच सोडून जावे लागेल सर्व काही. अनेक दिवस माझ्या मनाची घालमेल सुरू होती. नवर्याचे काम जहाजावरचे असल्याने ते अनेकवेळा बाहेर असायचे. त्यामुळे मलाच महत्वाचे निर्णय घ्यावे लागतात.
मग या सर्व परिस्थितीचा विचार केल्यावर मी म्हटले आपल्या मुलाचा आनंद ज्यामध्ये आहे ते आपण करायचे. म्हणून मग कोलब्याच्या जवळपास कुठे क्रिकेट कोचिंग आहे का, हे मी इंटरनेट द्वारे शोधण्यास सुरूवात केली. तर शोधता शोधता अचानक माझी नजर दिलीप वेंगसरकर अकादमी यावर गेली. लगेच फोन करून मी या कोचिंग अकादमी विषयी माहिती मिळवली. येथे कामत सर, माने सर आणि कुलकर्णी सर कोच म्हणून काम पाहतात. त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटले. त्यानी देखील मला तितक्याच उत्स्फुर्ततेने माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली. मला आणि माझ्या मुलाला योग्य मार्गदर्शन दिले. तर काय लगेच आऋुशला त्या अनुषंगाने लागणार्या साहित्याची खरेदी केली. हे कोचिंग रोज ३ ते ६ या वेळात चर्चगेट जवळील ओव्हल मैदानात होते. तेव्हा लगेच मे या अकादमी मध्ये आरुषचे नाव नोंदविले. मी देखील या वेळात इथेच येऊन बसते. शेवटी त्याचा आनंद तोच माझा ही आनंद हो. बदालीचे पुढेचे पुढे पाहून घेऊ. शेवटी वर्तमानात तर आनंदी आहोत, हा विचार करून मस्त वाटतं. म्हणून तर म्हणते, अहो वर्तमानात जगायचं. कालचा किंवा उद्याचा विचार करून वर्तमान का खराब करायचा? बदली होईल तेव्हा बघुयात.