सोमवार, २५ मे, २०१५

कट्टा गँग

                                         Displaying IMG-20150810-WA0002.jpg
  
          आजकालच्या या फेसबुक व्हॉटसएपच्या जगात कोणाला वेळ आहे, कट्यावर बसायला. पण असच अगदी नाही हं. या नवीन टेक्नॉलॉजीच्या जगात आम्ही कट्टा संस्कृती अजूनही टिकावली आहे. आमचा व्हॉटसअप वर "TTM Katta" नावाचा एक ग्रूप आहे. पडला ना प्रश्न TTM म्हणजे काय असा? तर याचा अर्थ 'Travel and Tourism Management'.
          याची सुरूवात झाली सुमारे १९९५ या काळात. एच. पी. टी. आर्ट्स कॉलेजमध्ये पहिल्यांदा हा विषय सुरू झाला. आमचा ३० जणांचा मोठा ग्रूप होता. त्यावेळी आम्ही लेक्चर झाल्यावर काही काळ या कट्यावर बसायचो. तिथे बसून कधी नवीन नवीन टूरिझम प्रोजेक्ट विषयी चर्चा करायचो, तर कधी आम्हीच एखादी टूर देखील ऑर्गनाइज़ करायचो. त्या कट्यावरच्या आठवणी काही वेगळ्याच आहेत. बर्‍याचदा या कट्यावर बसून आम्ही परीक्षेच्या काळात अभ्यास देखील करायचो.
          पुढे सर्वजण आप-आपल्या आयुष्यात गुंतून गेले. पण आता या व्हॉटसअप वर आम्ही एक ग्रूप बनविला आहे, 'TTM KATTA' नावाचा. त्या निमित्ताने आम्ही पुन्हा सर्वजण एकत्र आलो आहोत. आणि रोज संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या व्हॉटसअप रूपी कट्यावर भेटतो. आणि अक्षरश: कट्यावर गप्पा माराव्या तशा टप्पा मारुन पुन्हा आपल्या कामाला लागतो. कधी कोणाचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस देखील साजरा करतो. त्यामुळे पुन्हा एकदा कॉलेजमध्ये गेल्यासारखे वाटते.