सोमवार, २० जुलै, २०१५

एका प्रवासाची गोष्ट

         


       माझे पती कमांडर शिशिर दीक्षित हे सेशेल्स या देशाचे नौसेनेचे सल्लागार म्हणून २००८-२०१० या काळात तिथले काम पाहत होते. त्यावेळी मी आणि माझा मुलगा असे आम्ही सर्व बरोबर राहत होतो. हे आफ्रिका खंडाच्या बाहेरच्या बाजूस बेट आहे. अतिशय निसर्गरम्य अशी ११५ बेट आहेत. त्यापैकी काही बेटांवरच वस्ती आहे.
          तर एक दिवशी आम्हाला शिडाच्या बोटीवर प्रवास करायची संधी मिळाली. हा अनुभव आम्हा सर्वांसाठी पहिल्यांदाच होता. या शिडाच्या बोटीत आम्ही एक पूर्ण दिवस राहणार होतो. क्रेओल टूरिझम तर्फे हे आयोजित केले होते. खाणं- पिणं त्यांच्याकडुनच होते. सकाळी लवकर जाऊन संध्याकाळी सूर्यास्तनंतर आम्ही परत येणार होतो. दिवसभर विविध कसरती आम्ही करणार होतो. आमच्या बरोबर इतर देखील काही प्रवासी होते. या बोतीतून निघताना ती कशी सुरू होते, शिवाय त्या शिडाचे पडदे कसे उघले जातात, हे दृष्य पाहण्यासारखे होते.
          या बोटीने आम्ही वलसा घालून बेटाच्या दुसर्‍या बाजूला गेलो. तिथे ती समुद्रात थांबली. आणि आता पुते काय करायचे हे ऐकायला आम्ही उत्सुक होतो. तेव्हा आम्हाला कळले की अजुन एका छोट्या होडीने आम्ही समुद्रात जाणार आहोत. आमच्या बरोबर त्यांनी स्नोर्क्लिन्गचे समान दिले. स्नोर्क्लिन्ग कसे करायचे या विषयी सूचं देखील दिल्या. ती होडी अथांग समुद्रात थांबली आणि आम्हाला उतरायला सांगितले. हा खरोखर वेगळा अनुभव होता. जितके ऐकायला आणि वाचायला हे सर्व मजेशीर वाटते, त्याहीपेक्षा प्रत्यक्ष अनुभव अवघड होता. पाण्यात उडी मारताना मनातली धाकधुक सांगायला नकोच. उडी मारल्यावर लगेच मी शिशिरला पकडले. आता पाण्याखाली जाऊन तिथले जग पाहायचे होते. एक दोन वेळा पाण्यात आत गेल्यावर आणि पाण्याखालची अनोखी दुनिया पाहून शिशिर्चा हात कधी सुटला हे कळलेच नाही. आणि मग भीती पण कुठे पळून गेली. खरच पाण्याखालचे जग वेगळेच असते. त्यात अनेक विविध रंगाचे लहान-मोठे मासे होते. आपले लक्ष सहजपणे वेधून घेत होते. काही मोठी मोठी कसावं देखील होती. भरपूर पाणवनस्पती होती. तसेच अनेक जिवंत आणि मृत कोरल्स पण पाहायला मिळाले. आपल्या भोवती हे माशांचे फिरणे मजेशीर वाटत होते. आपण स्वप्नात आहोत की सत्यात हे काळात नव्ह्ते.य आगळ्या-वेगळ्या जगातून बाहेर यायची इच्छाच नव्हती. ज्यावेळी आऋुश देखील पाण्यात उतरला आणि त्याने देखील काही काळ या अनोख्या जाचा अनुभव घेतला ,त्यावेळी छान वाटले. तो जेमतेम पाच वर्षाचा होता.
          मग आम्ही सगळे पाण्यावर आलो आणि आमच्या त्या शिडाच्या होडित दुपारच्या जेवणासाठी एकत्र आलो. प्रत्यक जन आपापला अनुभव सांगण्यात अगदी गुंग होऊन गेलो होतो. संध्याकाळी परत त्या बोतीतून बेटाच्या दुसर्‍या बाजूस जाऊन पोहोचलो. पण मन मात्र तिथेच त्य पाण्याखालच्या वेगळ्या जगात त्या माश्यांच्या भोवती पोहत होते.


सौ. अर्चना दीक्षित