बुधवार, २० एप्रिल, २०१६

मुलांचे संगोपन

मुलांचे संगोपन 

             माझे पती, कमांडर शिशिर दीक्षित, मुंबईत नौसेना अधिकारी आहेत. त्यांची नौसेनेमध्ये असल्याने वारंवार बदली होत असते. त्यामुळे त्यांच्याबरोबर मी आणि माझा मुलगा देखील जिथे जावं लागेल तिथे जात असतो. आम्ही पण या आयुष्याचा स्वीकार केला आहे.
            असंच सध्या मुंबईत असल्याने इथल्या वातावरणाशी जुळवून घेत आहोत. माझ्या मुलाला (आऋुशला) क्रिकेटची खूप आवड. पण कॉलनी मधल्या इतर मुलांना इतर खेळांची आवड. मग काय करावं, असा माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. त्याला अनेक प्रकारे समजाविण्याचा प्रयत्न केला. इतर खेळ खेळावे असा. पण त्याला काही केल्या हे पटेना. मला मात्र वाटत होते, की याला इतर कुठे क्रिकेट कोचिंग लावायचे आणि बदली झाली तर... तर मधेच सोडून जावे लागेल सर्व काही.  अनेक दिवस माझ्या मनाची घालमेल सुरू होती. नवर्‍याचे काम जहाजावरचे असल्याने ते अनेकवेळा बाहेर असायचे. त्यामुळे मलाच महत्वाचे निर्णय घ्यावे लागतात.
            मग या सर्व परिस्थितीचा विचार केल्यावर मी म्हटले आपल्या मुलाचा आनंद ज्यामध्ये आहे ते आपण करायचे. म्हणून मग कोलब्याच्या जवळपास कुठे क्रिकेट कोचिंग आहे का, हे मी इंटरनेट द्वारे शोधण्यास सुरूवात केली. तर शोधता शोधता अचानक माझी नजर दिलीप वेंगसरकर अकादमी यावर गेली. लगेच फोन करून मी या कोचिंग अकादमी विषयी माहिती मिळवली. येथे कामत सर, माने सर आणि कुलकर्णी सर कोच म्हणून काम पाहतात. त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटले. त्यानी देखील मला तितक्याच उत्स्फुर्ततेने माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली. मला आणि माझ्या मुलाला योग्य मार्गदर्शन दिले. तर काय लगेच आऋुशला त्या अनुषंगाने लागणार्‍या साहित्याची खरेदी केली. हे कोचिंग रोज ३ ते ६ या वेळात चर्चगेट जवळील ओव्हल मैदानात होते. तेव्हा लगेच मे या अकादमी मध्ये आरुषचे नाव नोंदविले. मी देखील या वेळात इथेच येऊन बसते. शेवटी त्याचा आनंद तोच माझा ही आनंद हो. बदालीचे पुढेचे पुढे पाहून घेऊ. शेवटी वर्तमानात तर आनंदी आहोत, हा विचार करून मस्त वाटतं. म्हणून तर म्हणते, अहो वर्तमानात जगायचं. कालचा किंवा उद्याचा विचार करून वर्तमान का खराब करायचा? बदली होईल तेव्हा बघुयात.

सौ अर्चना दिक्षित

थॅंक यू

थॅंक यू

          साधारण २००९ चा हा प्रसंग हा. माझे पती कॅप्टन शिशिर दीक्षित हे त्यावेळी सेशेल्स या देशाचे नौसेनेचे सल्लागार होते. त्यांच्याबरोबर मी आणि आऋुश देखील राहत होतो. भारतीय सरकारने आम्हाला पाठविल्याने आमच्या सर्वानकडे 'व्हाईट पासपोर्ट' होता.
          त्यावर्षी आम्ही फिनलंडला जायचे ठरविले. तिथे माझा भाऊ, अजेय गोटखिंडीकर, त्याच्या परिवाराबरोबर राहत होता. आम्ही सेशेल्सहून फ्रँकफर्त आणि पुढे फिनलंड ला गेलो होतो. त्र फ्रँकफर्त या ठिकाणी आम्हाला एक रात्र राहावयास लागले. आम्ही एअरपॉर्ट  वरच राहायचे ठरविले. सर्वात जास्त रहदारीचा हा एअरपोर्ट आहे हा. येथे जगभरातील अनेक विमाने येत - जात असतात. अनेक प्रवासी एका ठिकाणहून दुसरीकडे जात असतात.
          त्यावेळी यूरोपमध्ये जायचे म्हणून आम्ही रुपयांचे युरो करून घेतले होते. त्र काही युरो, ते सर्व व्हाईट पासपोर्ट आणि सर्वांची तिकिटे माझ्या पर्स मधे होती. सकाळी मी फ्रेश होण्यासाठी वॉशरूम मध्ये गेले. फ्रेश झाल्यावर बाहेर आले आणि पुन्हा विमानांची गर्दी पाहण्यात गुंग होऊन गेले. तेवढ्यात एक साधारण २०-२२ वर्षांची ती 'एंजेला' हातात एक पर्स घेऊन तिथल्या प्रवाश्याना विचारात होती, की त्यांच्यापैकी कोणाची आहे ही पर्स? माझं अचानक तिच्याकडे लक्ष गेले आणि वार्याच्या गतीने मी धाव घेतली आणि ती पर्स माझी आहे, असे मी तिला खात्रीने सांगितले. तिने लगेच ती पर्स माझ्या हातात देऊन पाहून घेण्यास सांगितले. माझे सर्व समान पाहून मला खूप हायसे वाटले आणि आसचर्य देखील वाटले. त्या एंजेलाचे आभार कसे मानावे हे मला समजलेच नाही. पण अशाप्रकारे टाइम्स मध्ये हा अनुभव लिहून माझे मनोगत व्यक्त करू शकते हे मला फार बरे वाटते. धन्यवाद.

सौ. अर्चना दीक्षित

क्षण कसोटीचे

क्षण कसोटीचे


          सुमारे २००९ मध्ये माझे पती कॅप्टन शिशिर दिक्षित, हे सेशेल्स या देशाचे नौसेना सल्लागार म्हणून कार्यभार सांभाळत होते. त्यांच्याबरोबर मी  आणि आमचा ४ वर्षांचा मुलगा आऋुश पण राहत होतो.
          त्या सुमारास माझ्या तळपायाला काही ठिकाणी कुरूपाचा त्रास सुरू झाला होता. अनेक वरवरचे उपाय करून झाले होते. पण त्या सर्वांचा मला काहीच फायदा होत नव्हता. म्हणून मग शेवटचा पर्याय म्हणून तळपायाचे ऑपरेशन करण्याचे ठरले. ऑपरेशन सेशेल्स मधे करायचे ठरले. आणि त्याप्रमाणे झाले देखील. पायाला साधारण ३-४ ठिकाणी १-१ इंच खोल जखम झाली होती. त्यामुळे पाय जमिनीवर टेकवणे शक्यच होत नव्हते. शिवाय तळपायाला टाके घालणे शक्य नसल्याने, हे सर्व खूप वेदनादाई होते. मी त्यावेळी घरात देखील कुबड्यांच्या मदतीने चालत होते. त्यमुले पुढील औषधोपचारासाठी मला भारतात यावे लागणार होते. शिशिर यांना काही कारणास्तव बरोबर येणे शक्य नव्हते. भारतात येते वेळी मला व्हिलचेअर वर यावे लागणार होते. एमिरेतस या विमानाने दुबईमार्गे मी आणि आऋुश भारतात येणार होतो.
          या सर्व प्रवासात मला माझ्या पायापेक्षा जास्त माझ्या मुलाची काळजी होती. कारण मला पाहावयास एक फ्लाइट अटेन्देण्ट होती. शिवाय दुबईला काही तास थांबावे लागणार होते. एवढ्याश्या ४ वर्षाच्या मुलाला एवढ्या मोठ्या विमानतळावर कसा काय संभाळू याची सतत काळजी वाटत होती. खूप मोठे विमानतळ, सगळीकडे विविध दुकाने शिवाय मोठी मोठी चॉक्लेट्स ची पण दुकाने. एकदम हात सोडून आऋुश कुठे गेला तर, पत्ता पण लागण अवघड होते.
          परंतु खरोखर आश्चर्य म्हणजे असे की माझ्या कसोटीच्या क्षणात त्या चिमूरद्याने माझी साथ सोडली नाही. त्यानेही माझ्या  व्हिलचेअर ला घट्ट धरून ठेवले होते. चॉक्लेट्स काय पण कित्तिवेळ पाणी देखील मागितले नाही त्याने. त्यामुळे माझ्या कसोटीच्या क्षणात आऋुशची मिळालेली साथ मी कशी विसरू शकेन.


सौ अर्चना दिक्षित

माझा खजिना

माझा खजिना


          आपल्याला कसला न कसला छंद असतो. कुणाला विविध प्रकारच्या काडेपेट्या जपून ठेवायचा छंद असतो, तर कुणाला चांगले सुविचार एकत्र लिहून ठेवायचा छंद असतो. कुणाला अनेक नट- नाटिनच फोटो जपून ठेवायचा, तर कुणाला खेळाडूंची माहिती गोळा करायचा छंद असतो. असे प्रत्येकाला नानाविध छंद असतात आणि त्याप्रमाणे ते जोपासत असतात.
          असंच मलाही एक वेगळा छंद आहे. माझे पती, कॅप्टन शिशिर दिक्षित, हे भारतीय नौसेनेत अधिकारी आहेत. त्यांची दर काही वर्षानी विविध ठिकाणी बदली होत असते. त्यांच्याबरोबर अर्थात आम्ही देखील जात असतो. मग ते भारतात असो वा भारताबाहेर. तर या सगळ्यामध्ये मला आवड लागली ती म्हणजे आम्ही जिथे -  जिथे जाऊ त्या-त्या ठिकाणचे प्रतीक म्हणून मला फ्रीज चे मॅगनेट्स गोळा करायची आवड निर्माण झाली. आता माझ्याकडे रशिया, ओमान, येमेन, सेशेल्स, सिंगापुर, आफ्रिका, इंग्लेंड, फिनलंड, हेल्सिन्कि, रीगा...ई... अनेक प्रकारची मॅगनेट्स आहेत. आणि हे सर्व मे फ्रीजवर जणू सजावट म्हणून लावून ठेवते. आणि माझ्याकडे येणारे पाहुणे देखील हे पाहून आश्चर्यचकित होतात आणि उत्सुकतेने पाहतात. तुमच्याकडे देखील अशा प्रकारचे मॅगनेट्स असतील, तर मला द्याल का आणि माझ्या या खजिन्यामध्ये भर घालाल का?


सौ अर्चना दिक्षित