
आत्तापर्यंत मी महाराष्ट्र टाइम्स मध्ये बरेच लेख लिहिले आहेत. त्यात मी बर्याचदा माझे यजमान (कॅप्टन शिशिर दीक्षित )भारतीय नौसेनेमधे असल्याचे ही म्हटले आहे. पण आमचे हे लग्न जुळून कसे आले, या विषयी मला लिहावे असे नेहमी वाटायचे. मग मनात आलं, याच माध्यमातून आपण लिहिले तर...?
हां तर झालं असं नेहमीप्रमाणे मुलगी वयात आली की तिच्यासाठी वर संशोधनाची मोहिम सुरू होते. हे काही नव्याने सांगायला नको. आमच्या घरीही ही मोहिम सुरू झाली. या प्रमाणे मुलांच्या घरी देखील 'सौ'शोधनाचे कार्य सुरू असते. माझ्या भावाच्या मित्राची आई (सराफ काकू) यांचे वधु-वर सूचक मंडळ आहे. त्यांची आणि दीक्षीतांची चांगली ओळख. तर त्यांनी दीक्षीतांना आणि गोटखिंडीकारांना हे स्थळ सुचविले. ठरल्याप्रमाणे कांदा-पोह्याचा कार्यक्रम पार पडला. मी आणि यजमांनी स्वतंत्र बसून प्रश्नपत्रिका सोडावीली. १०-१५ मिनिटात जेवढे प्रश्न येत होते, त्यांची एकमेकांना उत्तरे दिली. पण या भेटीनंतर दीक्षित यांच्याकडून फोन आला, अहो आम्हाला मुलगी पसंत आहे, पण आमच्या मुलाचे उत्तर खी समजत नाहीए. तेव्हा तुम्ही मुलीची पत्रिका आणि फोटो घेऊन जावे.
मी लगेच वडिलांना म्हटलं, मे घेऊन येइन. वडिलांनी मला अडवायचा प्रयत्न केला. ते म्हटले अस मुलगी जात नाही. मी म्हटले अहो नाही तरी नाहीच म्हटले, मग आता काय बिघाडणार आहे. त्यावर ते म्हणाले ठीक आहे. तुझ्या एक मैत्रिनिला घेऊन जा. मी म्हटल.. नको तिला हो म्हटले तर...? म्हणून मी एकटीच कायण्याटिक रूपी घोड्यावर बसून दीक्षित यांच्याकडे गेले. त्यांनाही मला एकटीला पाहून जरा आश्चर्य वाटल. पण मग नंतर आमच्या निवांत गप्पा झाल्या. माझ्या यजमानांशी सुद्धा छान गप्पा झाल्या. मग त्यांनी मला ह्याच मुलीशी लग्न करायचे असे ठाम सांगितले. मग मी त्यांना विचारले आधी नाही का म्हटलात म्हणून. त्यावर त्यांनी छान उत्तर दिले. ते म्हणाले त्यांना मला परत भेटायचे होते. कारण त्या कांदे-पोह्याच्या कार्यक्रमात १०-१५ मिनिटात काही ठरवणे अवघड होते. त्यांना मला परत भेटायचे होते. त्यावर माझे सासरे (श्री शशिकांत दीक्षित ) माझ्या यजमानांना म्हणाले, मुलीला परत भेटणे म्हणजे तिला 'हो' म्हणणे आहे. आणि नंतर हो नसेल म्हणायचे तर तिच्या भावनांशी खेळणे. तेव्हा हो म्हणायचे असल्यास तिला भेट, अन्यथा नाही म्हणून सांगुयात.
तेव्हा मी जेव्हा परत जाऊन गप्पा झाल्या, त्यानंतर मात्र माझ्या यजमानांनी हीच मुलगी असं ठाम सांगितल्यावर आमचा विवाह नक्की ठरला. तेव्हा पासून माझे सासरे मला 'बाजीगर' म्हणतात. ' हारी बाजी जितने वाले को ही बाजीगर कहते है' बर का सूनबाई...
सौ अर्चना दीक्षित
एका लग्नाची गोष्ट