सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७

घराचा शेफ़

रोटी लझाने
साहित्य: तज्या पोल्या, पालक, कांदे, टोमॅटो, कॉर्न चे दाणे, मीठ, चीझ, फ्लॉवर, गाजर, सिमला मिरची(लाल, हिरवी, पिवळी), ई.

कृती: प्रथम कढई मध्ये तेल घेऊन त्यात कांदा बारीक चिरून टाकणे तो लाल झाल्यावर त्यात पालक बारीक चिरून टाकणे, मग कॉर्न चे दाणे टाकून छान शिजवून घेणे. चवीनुसार मीठ टाकून हे मिश्रण बाजूला ठेऊन देणे.
दुसर्‍या कढई मध्ये तेल, कांदा, टोमॅटो घालून छान शिजवणे त्यात सर्व भाज्या बारीक चिरून व्यवस्थित शिजवून घेणे. चवीनुसार मीठ टाकून हे मिश्रण बाजूला ठेवणे.
एका काचेच्या भांड्यात तळाशी काही पोल्यांचे उभे आयता कृती काप करून ठेवणे. त्यावर पालकाच्या भाजीचे मिश्रण पसरवने. वरुन चीझ किसून सर्वत्र पसरवून टाकणे. त्यावर पुन्हा पोळीचा थर लावून, इतर भाज्यांचा थर पसरवने. मग पोळीचा आणि चीझ चा तर व्यवस्थित पसरवून हे सर्व ओव्हन मध्ये १७५ डिग्रिला साधारण चीझ वितलेपर्यंत ठेवणे आणि लगेच गरम गरम सर्व्ह करणे.