बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

माझा खजिना

कॅप कलेक्शन


          माझे पती,कॅप्टन शिशिर दीक्षित, हे भारतीय नौसेनेमधे अधिकारी आहेत. त्यांचे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या शिप्स वर पोस्टिंग येत असते. त्यांच्या बरोबर सेलिंग ला तर जाऊ शकत नाही, पण कधी शिप बंदरात उभे असेल तर हे अवश्य ती परवानगी घेऊन शिप वर शिप दाखवायला घेऊन जातात. त्यामुळे अनेक देशी आणि विदेशी जहाजावर मला जाता आलं. शिवाय विविध जहाज पाहायची संधी मिळाली. या देशी आणि विदेशी जहाजांचे स्त्रीचे स्वागत किंवा तिचे वेलकम करायची वेगवेगळी पद्धत आहे. हे ही  मला या जहाजानवर जाऊन आल्यामुळे अनुभवता अले. शीप चे ट्रडीशन जाणून घेता आले. पण काही गोष्टी बर्‍याच सारख्या वाटल्या.
          त्यापैकी मला आवर्जून जाणवलेली गोष्ट म्हणजे,   त्या शीप वरुन बाहेर पडताना आपल्या हातात त्या शीप चे सोव्हेनियर येते. त्यात विविध प्रकारच्या गोष्टी असु शकतात. कधी कप असेल, तर कधी ग्लास, कधी पेपर वेट, तर कधी शीप विषयी माहिती असलेल पुस्तक. शिवाय कधी त्या शीपची कॅप देखील मिळते.
          तर मला हे सर्वा जतन करून किंवा खजिना म्हणून जपून ठेवायची आणि ते योग्य जागी लाऊन ठेवायची भारी आवड. मी सगळ्या कॅप्स जिथे जिथे बदलिच्या ठिकाणी जाऊ तिथे तिथे  छान एकत्र करून त्या दिसतील अशा ठिकाणी लाऊन ठेवते. त्यामुळे त्या त्या जहाजावर गेल्याची आठवण देखील राहते आणि खजीनाही जोपस्ता येतो. या माझ्या छंदा मुळे मला नवीन नवीन जहाजानवर जायला नक्कीच आवडते. आणि एवढेच काय पण मी आता जिथे जाते तिथे जरा वेगळी टोपी दिसली की माझ्या खजिन्यात भर टाकायच्या दृष्टीने विकत घेते.

सौ अर्चना दीक्षित