गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३

मी सौंदर्यवती (16 नो एसी)

 आजकाल ना ऐकावं तेवढं नवलच आहे. जितकं तुम्ही लोकांशी गप्पा माराल आणि तितक्या काय काय नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळतात. ते खरंच नवलच आहे. आणि त्या सगळ्याची फॅशन झालेली असते म्हणजे हे अजूनच नवीन वाटतं मला.

आता हा पुढील फॅशनचा प्रकार ऐकून ऐकून तुम्हाला जर आश्चर्य वाटलं नाही तर का. ऐका तर मग या मैत्रिणींच्या गप्पा.

अगो आजकाल इतका उन्हाळा आहे ना काय सांगू वैताग आलाय आता. आणि फॅनचं तर काही वारच लागत नाही बाई काय त्रास आहे ना काय कराव समजत नाही बाहेर जायची इच्छा होत नाही घरात नुसतं घाम घाम घाण काय करावे. बाकी सगळं सोड संध्याकाळी ना तेवढ्यासाठी वॉकला जायची पण इच्छा होत नाही बाई माझी.  इतक्या गर्मीत कुठे जायचं बाई. मग काय मी आपलं मस्त स्प्लिट एसी घेऊन ठेवला घरात छान वाटतंय. आणि त्या खोलीत जाऊन बसते. आजकाल तर ना मी एका बाईला स्वयंपाकाला लावलाय. मग काय स्वयंपाक घरात जायला नको, आणि जेवण बनवायला नको बाई. कुठे बाई मरणाच्या गर्मीत स्वयंपाक करायचा. मस्तपैकी एसीमध्ये बसून छान छान वेगवेगळ्या सिरीयल बघते बाई मी. पण काय बाई मध्येच लाईट गेली ना की मग माझी चिडचिड होते. कारण एसी बंद होतो ना. मग लागतं परत उकडायला. आपल्याकडे लोड शेडिंग किंवा लाईट जाणं हे तर इतकं कॉमन आहे ना. पण जाऊ दे जेवढा वेळ लाईट असतात ना मी आपली तेवढ्या वेळेस बसते ग बाई. मीना तू काय करतेस. तू पण घेतला असशील ना एसी किंवा स्प्लिट एसी. उन्हाळ्याचे कसे दिवस काढतेस तू? थोडं बिल जास्त येतो पण ठीक आहे गं सोय झाल्याशी मतलब. नाही का गं मीना तुला काय वाटतं? 

अगं ज्योती खरंय तुझं म्हणणं एसी असली की सगळी सोय असते मान्य मला. आणि मलाही हे पटायचं खरंतर. पण ना माझी पोस्टींग अशा ठिकाणी झाली जिथे ना एसी न कसली सोय मग मला त्रास व्हायला लागला. तुला सांगते तेव्हा ना मी एके ठिकाणी जाऊन, म्हणजे साउथ ला एका शहरात जाऊन ना एक कोर्स असतो अगं. म्हणजे सांगते सांगते तो कोर्स म्हणजे तुम्ही एसी शिवाय कसे राहू शकतात या विषयावर. तर तिथे ना तुम्हाला शिकवलं जातं, की एसी शिवाय नैसर्गिक वातावरणात तुम्ही कसे राहू शकता. निसर्गाच्या सानिध्यात राहून तुम्ही निसर्गाला कसं आत्मसात करू शकता. हा कोर्स इथे मी केला ग आणि तेव्हापासून खरं सांगू का, मला फरकच पडत नाही. घरात एसी असला काय किंवा नसला काय. मी राहू शकते बाई अशी. काही दिवसांचा कोर्स असतो हा. सुरुवातीला ऐकल्यावर मला जरा नवलच वाटलं. पण म्हटलं चला करून तर बघूयात.  म्हणतात ना केल्याने होतची आहे रे आधी केलेची पाहिजे. तुला खोटं वाटेल पण मी गेले त्या कोर्सला. एक-दोन दिवस वाटतं की आपल्याला  नाही शक्य हे. पण मग काही नाही गं हळूहळू होते सवय त्याची. आता मला विचारशील ना, तर खरंच मला फरक नाही पडत एसी किंवा इव्हन फॅन चा देखील. मला वाटतं आपल्या मनावर ताबा असला ना, आपल्या मनावर कंट्रोल हो असला, नक्की सगळं सहज शक्य होतं असं माझं मत आहे हं. त्यामुळे लोड शेडिंग झालं काय किंवा लाईट गेले काय मला नाही फरक पडत. मी तर म्हणते जमलं ना तर तु पण त्या कोर्सची माहिती काढून घेऊन नक्की हा कोर्स कर. अगं त्या एसीत राहून राहून ना सगळी दुखणी आपण जवळ बोलवत असतो. आणि आजकाल हा कोर्स करण्याची फॅशन झाली बर का ग. ज्योती कसली आजकाल फॅशन होईल काही सांगता येत नाही बाई. काय आहे ना. पण जे काही आहे, मला तर याचा अनुभव चांगला आलाय. तर मग तू पण विचार कर असं मला वाटतं. आणि कर की फॅशन आत्मसात. नाहीतरी टीव्हीवर आजकाल ऍड असतात श. इलेक्ट्रिसिटी वाचवा, ज्या खोलीतून बाहेर जाल, तिथली लाईट फॅन सगळं बंद करा. निसर्गाच्या सानिध्यात जा. अशा वेगवेगळ्या असतात. व त्यापेक्षा हा कोर्स करून जर आपल्याला काही समाधान सुख मिळत असेल तर काय ग वावगं त्याच्यात. 

अगं ज्योती, मीना तुमच्या गप्पा ऐकून ना गंमत देखील वाटली. मजा पण आली. आणि पटलं देखील काही गोष्टी. पण मी सांगू माझ्या लग्नाला बावीस वर्षे झाली आहेत. पण मी अजूनही एसी वगैरे घेतलं नाही बर का. माझ्या पण पोस्टिंग अशा ठिकाणी झाल्या आहेत, की लोक म्हटले आता तर काय ही 100% एसी घेणार. पण नाही बाई मी नाही घेतला एसी. आजकाल तर माझे मिस्टर पण म्हणतात, बरं झालं तू एसी ची सवय नाही लावून घेतली. त्यामुळे अनेक उपक्रमात तू सहभागी होऊ शकतेस. घराला छान बाल्कनी आहे, तिथे जाऊन छान वाचन करू शकतेस, स्वयंपाक घरात जाऊन वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करू शकतेस, आणि बाहेरच्या जगात वावरून बाहेरच्या जगाची देखील छान माहिती घेऊ शकतेस. प्रत्येक गोष्ट छान एन्जॉय करू शकतेस. आणि तुझ्या या स्वभावामुळे आम्हाला देखील आता तीच सवय लागलीये त्यामुळे आम्ही पण वेगवेगळ्या उपक्रमात आम्हाला बिझी ठेवायचा प्रयत्न करतो. 

काय मग रसिक  वाचकांनो. कशी वाटली ही नो एसीची फॅशन. करायची का आत्मसात? आणि हरकत काय आहे जर चांगली फॅशन असेल तर, करूयात कि हो आत्मसात. 

पण हे माझं वैयक्तिक मत आहे बरं का.  प्रत्येकाला पटलच पाहिजे असं काहीही माझा आग्रह नाही. कोणत्या फॅशनच्या किती आहारी जायचं, ते आपलं आपणच ठरवायचं.


सौ अर्चना शिशिर दीक्षित 


मी सौंदर्यवती (१५ आपला समाज)

 काय करते आहेस? झाली का सगळे काम सकाळची? झालीस का निवांत? का अजून काही करणं बाकी आहे? तुला काय बाई, बर आहे तुझ्याकडे कामाला बाई आहे. सगळी कामं ती करत असेल. तू आपली मस्त हातावर हात ठेवून बसत असशील. आमचं तसं नाही ना. आमची कामवाली बाई कधी येते, कधी नाही येत, कधी दांड्या मारते. मग काय सगळीच कामं आम्हालाच करायला लागतात. काय सांगणार माझी बाई गेली सुट्टीवर. काय तर म्हणे, आजारी पडली. दोन दिवस येऊ नाही शकणार. मग काय तर सकाळपासून बसले दोन भांडी स्वयंपाकाचा पसारा घेऊन. उगवेल परवा असे म्हटली आहे, बघूया. या आजकालच्या बायांची ना फॅशनच झाली आहे, दर काही दिवसांनी सुट्टी घ्यायची. तुमच्याकडे होतो का हा त्रास? किंवा तिकडे आहे का ही फॅशन बायांनी सुट्टी घ्यायची? 

अगं मीना काय म्हणतेस तू? कसली फॅशन आणि कसलं काय. आणि फॅशन कशाला म्हणायचं याला. मी तिला महिन्यात ना एक दोन दिवस सुट्टी देते त्यांनाही वाटतं ग. बाहेर जावं मुलांबरोबर किंवा कुटुंबाबरोबर वेळ घालवावा. त्यांच्यासोबत फिरावे. नवीन नवीन त्यांनाही ठिकाण दाखवावी. काहीतरी चांगलं खावं प्यावं. आपण जसा आपला स्वतःचा विचार करतो. तसे त्यांचे इतर आयुष्य आहे.  मग ह्या सुट्टीची फॅशन का कसली म्हणायची? मला विचारशील तर मला तर वाटतं, त्यांना महिन्यातुन एकदा किंवा दोन दिवस सुट्टी दिली गेली पाहिजे. शेवटी ती पण माणसं. त्यांना भावना नाही का? त्यांना काही इच्छा नाही का? आपल्याला पण तर बदलत्या फॅशन प्रमाणे वागायला आवडतं जगायला आवडतं छान छान राहिला आवडतं. तसंच त्यांच्याही तर काही आवडीनिवडी आहेत. आणि का नाही ग. का नसाव्यात? त्यांनी पण आजकालच्या फॅशन प्रमाणे राहायला पाहिजे की. सुट्टीचा आनंद घेतला पाहिजे की. असं कसं म्हणून चालेल? आपण समोरच्याला समजून घेतलं ना, तर समोरचा आपल्यालाही समजून घेतो. त्याचा अगदी फायदा उचलत असतील म्हणजे गैरफायदा उचलत असतील तर ते चुकीचं. पण तो वेळ ते योग्य ठिकाणी घालवणार असतील, तर काही हरकत नाही. त्यांच्या देखील काही गरज असतात ग. हे काम झाल्यानंतर बायांना घरातला एक सदस्यच बोलून जातात. त्यांचा लगेच पगारच कट करणं मला नाही पटत नाही बाई. 

हे असे संवाद आपण वारंवार ऐकत असतो. किंवा आपणही कोणाशी करत असतो. पण खरं तर आपणही सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे.  तर काहींना सवय असते, भाजी बाजारात किंवा लोकल मार्केट म्हणतो ना आपण तिथे उगीचच भाव करायची. म्हणजे बार्गेन करायची हो. उगाचच त्या भाजी बाजारात हुज्जत घालत बसतो. भाजीवाल्याची एवढी महागच का दिली. याची क्वालिटी तशी का ती पुढची माहिती आहे, इतके कमी पैसे घेते. तिकडे गेले तर एवढ्या पैशात मिळू शकते. तू काही फारच महाग विकतेस. काही तर पैसे कमी कर नाहीतर मी नाही घेणार तुझ्याकडून पुढच्या वेळी भाजी आणि फळ पण. मी त्या पलीकडच्या दुकानातून घेत जाईन हं. या अशा प्रकारच्या संवादाची जणू फॅशन झाली आहे पण काय करणार असतात काही काही लोक अशी खरं तर ना हीच लोक जेव्हा मॉलमध्ये वगैरे जातात त्यावेळी अगदी महागाच्या दुकानातून म्हणजे ब्रांडेड गोष्टी खरेदी करण्यास त्यांना फार रस असतो बरं का पण भाजी बाजारात मात्र खूप जर घालताना बाई नाही आली म्हणून तिच्याशी हुज्जत घालताना नेहमीच आपल्याला दिसतात आणि काही लोक यातली बाकी ठिकाणी म्हणजे उगाचच समाजकार्य करताना दिसतात म्हणजे रोजच्या व्यवहारातील किंवा रोजच्या आयुष्यातील जी लोक समोर असतात त्यांना मदत करण्यापेक्षा समाजकार्य करण्यातच त्यांना फार रोज असतो खरं तर ना म्हणजे माझं अगदी पर्सनल मत बर का की रोज तुमच्या आयुष्यात येणारे लोकांनाच तुम्ही थोडी थोडी मदत केली ना म्हणजे बाईच्या भावना समजून घेणे तिची परिस्थिती समजून घेणे तिच्याशी योग्य वागणूक देणे तिला तर तेही एक समाज कार्य आपल्याच जवळच्या मदत करणं आणि नको तिथे उचलत न घालणार ते योग्य उगाचच गरज नसताना मोठ्या मोठ्या मॉल मधून किंवा ब्रॅण्डेड दुकानातून नुसतीच खरेदी करत राहण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये म्हणजे मी म्हटलं तसं छोट्या छोट्या किंवा आपल्या जवळच्या लोकांना मदत केली तर ते खरं समाजकार्य हो साधं म्हटलं तसं की आधी घरच्यांना बघा माझ्या आधीच्या लेखाप्रमाणे पण की आधी आपल्या आसपासच बघा घरच्यांना बघा म्हणजे घरच्यांच्या गरजा राहिल्या बाजूलाच आणि तिसऱ्यांच्याच भागवत आहे हे कुठलं समाजकार्य त्यापेक्षा आपल्या घरातूनच समाजकार्य सुरू करूयात ना घरच्यांच्या गरजा भागून घरच्यांच्या जवळच्या म्हणजे आज स्पष्ट लोकांच्या गरजा त्यांचे काही प्रॉब्लेम असतील तर ते समजून घेणार आणि ते सोडवणे हे खऱ्या अर्थी समाजकार्य असं मला वाटतं आता मी बरोबर आहे का चूक आहे हेही कधी कधी व्यक्तीच सापेक्ष असते ना. म्हणजे भीक मागणाऱ्याला भीक नका देऊ काय मला मान्य आहे. कारण नाहीतर त्याला तशीच फुकट खायची सवय लागेल. पण जे कष्टकरी आहेत मेहनत करणारे आहेत त्यांना त्यांचे कष्टाचा चीज होईल असा तर काही केलं गेलं पाहिजे ना.

हो मला माहिती आहे की हा लेख थोडासा आधीच्या लेखाला धरूनच आहे .पण काही हरकत नाहीये. कारण काही लोक खरोखर असंच वागतात हो. म्हणून थोडी कळकळीची विनंती की समाजकार्य करायचा आहे ना, तर आपल्या आधी घरापासून सुरू करावे. समाज कार्य करायचं असेल ना तर आपल्या घरापासून किंवा आपल्या लोकांपासून सुरुवात करावं आपल्या लोकांना दुर्लक्ष करून किंवा आपल्या समाजाशी वैर साधून, दुसऱ्या समाजाचे भलं करायचं, हे कुठलं आल्यावर समाजकार्य. काय मग तयार आहात ना नवीन फॅशन करायला?  नवीन फॅशन म्हणजे नवीन फॅशन प्रमाणे आपल्याच लोकांना आधी महत्त्व द्यायला? चला तर मग आपल्या समाजाचा कार्य करूयात.


सौ अर्चना दीक्षित

मी सौंदर्यवती (१४ समाजकार्य)

 'वसुधैव कुटुम्बकम्'

अहो आता काय सांगणार आजकाल समाजकार्य ही पण एक फॅशनच व्हायला लागली आहे. कितीतरी लोक असतात ती खरोखर मन लावून समाजकार्य करत असतात.  म्हणजे अक्षरशः स्वतःला वाहून घेतात या समाजकार्यासाठी. आणि मी म्हणते त्यात चुकीचं नाही ना,  बरोबरच आहे.  आपण जर या समाजाचे काही घटक आहोत. तर या समाजाला आपल्याकडून काहीतरी परत दिलं गेलं तर त्यात एक वेगळच समाधान असतं. आणि यातूनच सामाजिक बांधिलकी याची देखील भावना निर्माण होते. आणि या सामाजिक बांधिलकीची जाणीव एका दोघाला असून उपयोगी नाही, तर सगळ्यांना किंवा अनेकांना याची जाणीव असली पाहिजे. मग तो तुमच्या आजूबाजूचा समाज असो किंवा इतर कुठेही असो. आणि या समाज म्हणजे एखादी जात धर्म असं न बघता माणसाने माणसासाठी केलेली मदत किंवा सहकार्य म्हणजे समाजकार्य असे मला वाटतं हं. यातूनच आपल्यातील जी माणुसकी असते तीही जागृत राहते. आपल्यामुळे एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या कुटुंबाचे एवढेच काय एखाद्या समाजाचे जर चांगले होत असेल आणि त्यातनं जे मिळणार समाधान असते ते खरोखरच छान नाही का? अहो इतकच काय पण आपण जे कार्य करत असतो,  काम करत असतो ते आपल्या घरातली प्रत्येक व्यक्ती बघत असते आणि त्यापासून ते प्रोत्साहन / प्रेरणा पण घेत असतात. 

बऱ्याचदा आपण कित्येक घरांमध्ये बघतो की अख्या जगाच्या  हे समाजकार्याचा जणू विडा उचलत असतात. अख्या घरात म्हणजे घरातले आजी, आजोबा, आई, वडील, मुलं हे देखील त्या समाजकार्यासाठी झटत असतात. हे किती प्रेरणादायी आहे, असं मला वाटतं. अशा घरातील वातावरण पण बघा नेहमी समाधानी, आनंदी असंच आपल्याला दिसून येतं. अशा घरातील व्यक्तींच्या समाजाकडून खूप काही अपेक्षा नसतात. पण आपण समाजासाठी काहीतरी करत राहणार, ही मात्र त्यांची नेहमीच तळमळ असते. वसुधैव कुटुम्बकम अशीच भावना त्यांच्या मनात असते. अहो हे खरंच वाखाणण्यासारखीच गोष्ट आहे. जगातल्या सगळ्यांनाच नाही जमत बर का हे. आणि जमलंच पाहिजे असाही माझा आग्रह नाही. केवळ सामाजिक बांधिलकीची भावना असावी एवढेच माझं मत आहे. 

आणि हे सगळं करताना मला समाजाकडून काय मिळेल याची अपेक्षा करणं चुकीचं असं माझं मत आहे. नाहीतर कधी कधी काहींच्या मनात असे येतं, 'मी त्याला मदत केली पण त्यांनी माझ्यासाठी काय केलं. काहीच नाही ना. मग मी कशाला विचार करू, द्या सोडून, मी नाही करणार यापुढे कोणाची मदत. त्या व्यक्तीचा किंवा त्या समाजाचा मला काय उपयोग. मला काय घेणं समाजाचं.  मी नाही समाजकार्य वगैरे करत बसणार. माझं माझं काही कमी आहे, की मी त्या समाजाचा घेऊन बसू. कोणी सांगितलं नसती उठा ठेव करायला. जाऊ दे ना राव बघू उद्या काय गरज पडली तर.' हा असा विचार करणारे देखील अनेक जण असतात.

गंमत वाटेल पण एक खरं आहे बर का, तर काही लोकं फॅशन म्हणून देखील समाजकार्य करतात बर का. अगदी मोठ्या आवाक्यात सांगतात,  'हो बाई मी समाजकार्याचे नाव एक कोर्सच केलाय मागे एकदा.  तर मला  समाजकार्य करायला फार आवडतं.' 

हे सगळं बरोबर आहे.  किंवा बरोबर आणि चूक याचं गणित मांडण्यापेक्षा मला बऱ्याचदा असं वाटतं की आपल्याला काय बरोबर वाटतं हे करणे योग्य आहे. 

तरी यात काहींचं म्हणणं आहे की समाजकार्य करण्यापेक्षा म्हणजे समाजकार्य तर केलंच पाहिजे नाही असं नाही पण समाजकार्य करण्यापेक्षा आपल्या घरातलं सगळ्यांचं सुरळीत चाललंय की नाही, याची देखील खात्री केली गेली पाहिजे.  नाहीतर काय होतं काही घरांमध्ये समाजकार्य समाजकार्य करण्यापेक्षा घरात नाही व्यवस्थित शांती समाधान क्लेश सतत सुरू असतात आणि बाहेर समाज कार्य यापेक्षा आधी आपण आपलं कुटुंब मग आजूबाजूचा समाज मग आजूबाजूची आपण म्हणूयात कॉलनी असं करत करत आपण आपलं कार्य सुरू ठेवला पाहिजे असं मला वाटतं. आपल्या घरातूनच पहिले समाजकार्य सुरू झाले पाहिजे. घरातल्या काही अडचणी असतील तर त्या आधी सोडवणे.  हे त्या अडचणी न बघता बाहेरची कार्य करत राहायची.  हे कितपत बरोबर आहे किंवा चुकीचा आहे, हा एक प्रश्नच आहे बाबा. नाहीतर समाजाला सुधरवायला जाल. पण घर विस्कळीत, किंवा पसरलेलं, असं तर होत नाही ना. याची थोडीशी काळजी घेतली पाहिजे बर का.

खरंतर प्रत्येकाने ठरवलं ना तरी सहज शक्य आहे. प्रत्येकाने फक्त एवढंच ठरवायचं आधी माझं घर समाधानी आहे की नाही.  त्यांच्या सगळ्या गरजा पुरवल्या गेल्या की नाही. एकदा घर झालं की मग आजूबाजूचा समाज, मग त्याही पलीकडचा जो समाज असतो, आणि मग असं करत करत इतर लोकांचं गरजा किंवा समाधान करणं म्हणजे समाजकार्य करणं असं मला वाटतं. म्हणून तर म्हटलं ना समाजकार्य हे आपल्या घरापासून सुरू झालं पाहिजे. नाहीतर घरात नाही शांती समाधान आणि चाललेत जगात शांती पसरवायला. 

अरे सोशल वर्क आजकालची फॅशन आहे भाऊ केलेच पाहिजे ना राव. घर काय घरातच आहे.  घराकडे काय उद्या पण बघता येईल उद्या नाही परवा बघता येईल परवा नाही तर तेरवा बघता येईल. घरातल्यांची काय नेहमीची भुण-भुण आहे. 

अहो असा देखील विचार कित्येक लोक करत असतात आता काय सांगायचं. 

वसुधैव कुटुम्बकम वगैरे असे मोठे मोठे शब्द वापरायचे नाही. वापरले पाहिजे त्याबद्दल माझं काहीच दुमत नाही. आणि तसं कार्य केलं पाहिजे याबद्दल देखील वाद नाही. परंतु सगळ्यात आधी माझे आई-वडील माझी बायको किंवा माझा नवरा माझी मुलं हे समाधानी आहेत का. ते झाल्यानंतर माझ्या आजूबाजूचा परिसर आजूबाजूच्या व्यक्ती माझे नातेवाईक हे समाधानी आहेत का. असा जर विचार केला गेला तर खरं समाजकार्य. 

काय मग मंडळी पटतंय ना?  करूयात ना सुरुवात आपल्या घरापासूनच समाजकार्याची.  हा विडा उचलूयात ना सगळे मिळून. कारण आपण सुधारलो, तर समाज सुधारणारच ही खात्री बाळगा मित्रांनो


सौ अर्चना दीक्षित

 


 

मी सौंदर्यवती (१३बॅगवती)

 'मैनावती झाली बॅगवती'

' ए अगं थांब थांब किती किती या बॅगा गोळा करशील?  घरी आधी त्या १५-२० प्रकारच्या पडल्या आहेत, त्यांची विल्हेवाट लाव ना. मग घे नवीन विकत. मी घेऊन देतो स्वतः हून वाटल्यास. पण त्या आधी यांचं कर ग काही.' 

'अहो आता काय बाई सांगू तुम्हाला. अहो आजकाल फॅशन आहे वेगवेगळ्या ड्रेस वर वेगवेगळ्या बॅगस् अय्या इश्श्य आणि बॅगस् काय म्हणता हो. त्यांना लेडीज पर्स म्हणतात. तुम्ही ना. जाऊदे तुम्हाला नाही कळायचं हे आमच्या बायकांचे फॅशनचे प्रकार. मला घ्यायची आहे ही. आणि इथे स्वस्तात मिळत आहे बरं का. तो पलिकडच्या गल्लीत दुकानदार आहे, तो खूप महागात विकतो ना.'

असं म्हणत बायका कधी कधी उगाच खरेदी करत असतात. पण खरं सांगू का पुरुष पण काही कमी नाही बरं का.  ते देखील तितकेच फॅशनच्या आहारी जातात की. त्यांचे फॅशनचे प्रकार वेगळे एवढेच. त्यांना आवड असते गॅजेट्सची. मग काय एखादं मोबाईल शॉप दिसलं की यांचे पाय आपोआप तिकडे वळतात. आणि मग सगळ्या मोबाईलचे फिचर्स जाणून घेत, सर्व समजल्याचा आविर्भाव आणत वावरत असतात. 

हा हा असो.

तर पॉंईंटाचा मुद्दा काय तर मैनावती होते बॅगवती. तर इतक्या सर्व बायकांमधून एखादी स्त्री अशी असते की जी या फॅशनच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करते. म्हणजे कोणाला कशा प्रकारच्या बॅगस् आवडतात? त्यांची नेमकी गरज काय आहे? त्यांचा उपयोग काय आहे? कोणत्या ठिकाणी कसा माल विकला जाईल? कापडी असावी की लेदरची असावी? का दोन्हीही गोष्टींचे कॉम्बिनेशन असावे?  त्यावरचे डिझाईन, त्यांचा रंग कसा असावा? त्यांची विक्री कशी होईल? त्यांचा प्रॉफिट कितपत होईल?  कोणत्या भागात खप जास्त आहे? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे सोडवत एखादी मैनावती ही बॅगवती बनते. असा सगळा विचार करणारी व्यक्ती खरोखर आदर्श आहेत. मग ती स्त्री असो किंवा पुरुष.

आपण केवळ फॅशन फॅशन करत मागे जातो. कोणी तरी एखादे ट्रेंड सेट केले की त्याच्या मागे पळतो. किंवा एखाद्या मुव्ही मधील दृश्य पाहून अथवा टिव्ही सेरिअल पाहून लगेच बाजारात जाऊन हूबेहूब गोष्ट आणायला पळतो. ' अहो तो आपण माधुरीचा सिनेमा पाहिला ना मागच्या आठवड्यात. तिने त्या मजंटा साडीवर जशी पर्स घेतली आहे ना, मला अगदी तशीच हवी आहे बरं का. पण कलर वेगळा हं. म्हणजे माझ्याकडे ती इंडिगो कलरची साडी आहे ना, माझ्या भाचीच्या साखरपुड्याला मिळालेली नाही का. हां तर त्या साडीवर परफेक्ट मॅचींग बॅग हवी आहे मला हं. तिसऱ्याच रंगाची घेतली गेली तर मला बाई आऊट डेटेड म्हणतील.'

या सगळ्या भानगडीत हे नेमके रंग डोळ्यासमोर आणायला पती देवाला बरीच मेहनत घ्यावी लागते. या सर्वांची सांगड घातली की तेव्हा कुठे ही खरेदी पूर्णत्वास येते. 

मजेदार आहे ना हो. आपल्याला अगदी मॅचींग बॅग हवी असते. नाही तर  गॉसिपिंगला विषय मिळतो. 'अग त्या दिवशी ना सीमा वहिनी स्वत:ला मॉड समजणाऱ्या अगदीच बाई आऊट डेटेड वाटत होत्या. त्यांची पर्स बिलकुल मॅचींग नव्हती बाई. माझं नसतं बाई तसं. मला तर ज्या रंगाचा ड्रेस किंवा ज्या रंगाची साडी त्याच रंगाची बॅग घ्यायला आवडते. हे तर मला ना म्हणतातच, यु आर ए रिअल बॅगवती. इश्श्य आमचे हे पण ना.'

पण मी म्हणते कशाला हो ही बरोबरी आणि हा अट्टाहास नको त्या गोष्टींचा. काय करणार नाही एखाद्याला हे पटत तर सोडून द्या ना. 

बघितला ना दोन मैनावती मधला फरक. पण काय बाबा फॅशन म्हटली की फॅशन. मग मैनावती बना की बॅगवती. ठरवा राव तुमचं तुम्हीच.


सौ अर्चना शिशिर दीक्षित 

मी सौंदर्यवती (१२ सौंदर्य प्रसाधने)

 "आपके त्वचासे आपके उमर का पता ही नहीं चालता है|"


झालं हे एक वाक्य ऐकण्यासाठी अहो बायका काय पुरुष देखील तितकेच उत्सुक असतात बरं का. 

आजकाल फॅशन प्रमाणे राहाणे सगळ्यांना आवडते. आणि मी म्हणते का नाही रहायचं. जरुर आपण या प्रमाणे रहायलाच हवं. जसं जग बदलत आहे तसं स्वतः मध्ये बदल घडवायला हवे. 

मग हे सौंदर्य जपण्यासाठी विविध उपाय करण्याचे मार्ग सुद्धा उपलब्ध आहेत.

'अग भावना ऐक ना मी काय म्हणतो मी ना आत्ता ऑनलाईन शॉपिंग वर काही गृह उपयोगी वस्तू मागवत आहे. तर बघ ना मला ना एक भारी फेस क्रीम आणि फेस लोशन दिसले आहे. खास पुरुषांसाठी. एवढ्यात जरा स्किन उन्हामुळे काळवंडलेली दिसते. काय म्हणते मागवून टाकु का. मागच्या आठवड्यात परश्याने पण बोलता बोलता म्हटले होते या प्रोडक्ट विषयी. आणि पहा ना आज सहज ऑनलाईन शॉपिंग करताना मला हे दिसले. जरा मागवून बघतो.'

'हो हो मागवाच बाई. एवढ्यात खरच तुम्ही काळवंडल्यासारखे वाटता हं. वापरून बघा. नाही आवडली तर देऊन टाका कोणाला.' अशी चर्चा काही ठिकाणी सुरू असते.

तर कुठे नवरा घरी आल्यावर क्षणाचा विलंब न करता बायको विचारते, 'अहो  काय मग आज मी कशी दिसते आहे?'

नवऱ्या पुढे मोठ्ठा प्रश्नच उभा राहतो. तो थोडा वेळ विचार करून म्हणतो, 'अरे वाह भारीच की. परिस्थित चाचपडत आज पार्लर मध्ये गेली होतीस वाटतं. मस्त ग मस्तच.' त्यावर बायको खुष होत म्हणते, 'अय्या, कसलं ओळखता हो तुम्ही. मान गए आपको. पण खरं सांगू का, मी ना पार्लर मध्ये नव्हते गेले. अहो त्या रेवाची आई आहे ना, तर त्या ना घरगुती सौंदर्य प्रसाधने तयार करून विकतात. आणि किंमत देखील आवाक्यातील आहे हो. म्हणून म्हटले घेऊन जरा वापरून बघावं. मला पण छान वाटत आहे हे.'

तर काही घरांमध्ये तर ब्रॅंडला महत्व दिले जाते. 'ज्याचं नाव त्यालाच भाव', असं मानतात. हो मी कुठे काही हरकत घेत आहे. बिलकुल चालेल कोणतेही सौंदर्य प्रसाधन. काय हवं ते वापरा. आता याचा अर्थ चुकीचा नका घेऊ. वाट्टेल ते वापरा, असा अर्थ नका हं घेऊ. 

कारण काय असतं, प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेचा रंग, त्वचेची रचना, ऋतू नुसार होणारे त्वचेतील बदल, काही कारणांमुळे हवामानामुळे त्वचेवर होणारा परिणाम या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मगच आपल्याला सौंदर्य प्रसाधने निवडावी लागतात. बरेच वेळा काहींची त्वचा संवेदनशील असते. कोणतेही क्रीम त्यांना लाऊन चालत नाही. योग्य मार्गदर्शन घेऊन, तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रसाधन वापरणे योग्य आहे. 

नाही तर टिव्ही वर जाहिरात बघुन लगेच तेच छान आहे. 'मग बघा ना करीना कपूर तेच वापरते. मी पण हेच विकत घेणार.' असं किंवा शाहरूख खान जे चेहऱ्यावर क्रीम लावतो, ते जगात भारी. आपण पण तेच लावणार ना भो. असं म्हणणं अयोग्य आहे हो. 

एवढेच काय पण आपण सौंदर्य प्रसाधनाच्या दुकनात जातो आणि त्यांनाच विचारतो, 'सध्या कोणते प्रोडक्ट जास्त छान हो भाऊ? मला तर बाई शुगर, नायका, मेबीलिन अशी नावे माहीत आहेत. ' दुकानदार काय त्याला विकायचेच आहे त्याच्या दुकानातील वस्तू. तो अजून अजून महाग प्रोडक्ट दाखवत आणि त्याविषयी अगदी पटवून सांगत, आपला माल विकत असतो. 

तर काही लोकं ऑनलाईन शॉपिंग स्वस्त पडते म्हणून त्यांच्या नादाला लागतात. 'कुठे त्या दुकानात जा, गाडीचे पेट्रोल खर्च करा, त्यापेक्षा हे ऑनलाईन शॉपिंग बरं बाई किंवा बरं बुआ. मस्त घर बसल्या हातात येते. आणि शिवाय स्वस्त पडतं. कोणते का प्रोडक्ट असेना. आपल्याला काय चेहऱ्यावर, हाताला काही तरी क्रीम फासले म्हणजे झाले. इथे कोणाला एवढा फालतुचा वेळ आहे राव.'

इथेच आपण जरासे चुकतो हो. मग त्याचा दुष्परिणाम आपल्यालाच भोगावा लागतो. म्हणून तर स्वतःची काळजी स्वतःला नीट जाणून घेऊन, योग्य मार्गदर्शन घेऊन करा. 

काय मग स्वतः साठी वेळ काढायला तयार ना? 


सौ अर्चना शिशिर दीक्षित 


मी सौंदर्यवती (११गेमस्)

 'आओ खेल खेल मे'

माझा हा लेख म्हणजे जरा या आधीच्या लेखाचा पार्ट टु म्हटलात तरी चालेल हं. खरं तर या ऑनलाईन गेम्स वर खुप काही लिहिता येईल. हा विषयच असा आहे. सो कॉल्ड आजकालची फॅशन. फॅड म्हणा ना.

पण खरोखर घराघरात हे दृष्य बघायला मिळते. जो येतो तो त्याच्या नादाला लागला आहे. त्यामुळे कोणाला बोलायचे आणि काय समजावून सांगायचे, हा देखील एक प्रश्न पडतो. त्यामुळे होणारे परिणाम किंवा दुष्परिणाम यांचा विचार सुद्धा केला जात नाही. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळे या जगात पार रममाण होऊन गेले आहेत. इतकेच काय गमतीत सांगायचे झाले तर कोणाच्या घरी गेले तरी, ' अहो जरा वाय फायचा पासवर्ड मिळेल का हो ' हे विचारायला पण मागे पुढे पाहत नाहीत. 

काही जण तर जणू कोणी भेटायला आले तर ट्रे मध्ये पाण्याच्या ग्लासच्या ऐवजी वायफाय चाच पासवर्ड देत असावेत. हाहा. जोक्स अपार्ट हे असले व्हायला फार काही वेळ लागणार नाही, असे वाटते. 

म्हणजे मोठ्या उत्साहात एखादे स्नेहसंमेलन आयोजित करतात. बरं का. 'खुप दिवस झाले बाई आपण त्या अमक्या अमक्या लोकांना घरी बोलावलेच नाही ना. या शनिवारी बोलवायचे का हो? मागे त्यांनी आपल्याला बोलावले होते ना. आपण पण उरकून टाकू. म्हणजे उगाच बोलायला नको कोणी, आपण बोलावलं नाही म्हणून. आणि हो बाहेरून काही पदार्थ ऑर्डर करुयात. म्हणजे त्या स्वयंपाक घरात मी अडकुन नाही राहणार. हो ना हो. तुमचं काय मत आहे? '  तो नवरा पण फोन मधून डोकं वर काढत, काही बोलणं समजलं नसलं तरी बायको काही बोलायला नको म्हणून दुजोरा देऊन मोकळा होतो. 

जेष्ठ नागरिक तर मोबाईल नवीन हातात आला तर एक मिनिट सोडत नाहीत. जणु एका दिवसात त्यांना शिकायचा आहे, तो कसा वापरतात ते. मग काय ते देखील तासंतास त्या मोबाईल वर वेळ घालवला सुरुवात करतात. नातवंडांना तेवढंच फावतं. आजी आजोबांना नवी गॅजेट्स शिकवायच्या निमित्ताने आपण पण वेळ वाया घालवत बसतात. 

त्यामुळे एकमेकांमध्ये संवाद कमी होऊ लागले आहेत, हे लक्षातच येत नाही कोणाच्या. मुलं तर एकलकोंडी बनत आहेत. हे वेळीच लक्षात आले तर ठिक. नाही तर नुकसान व्हायला फार काळ लागत नाही. 

कुठे बाहेर फिरायला गेले तरी त्या कार मध्ये काय किंवा कोणत्याही वाहतूक मार्गाने गेले तरी आजुबाजुला मागे पळणारी झाडे, डोंगर, निसर्ग, खरं म्हणजे सृष्टीसौंदर्य न बघता सगळ्यांचे लक्ष त्या मोबाईल गेम मधेच. काही सांगायला जा तर ओरडतात, ' अगं आई थांब ना जरा. तो ॲंग्री बर्ड गेम खेळतो आहे ना यार. काही राऊंड राहिले आहेत. आणि मला नाही त्या निसर्ग बघण्यात इंटरेस्ट. कसलं बोर आहे बाहेरचे दृश्य.' त्याच गेम मध्ये धाकटी बहीण किंवा भाऊ देखील मग्न होऊन जातात. 

कोणाच्या घरी गेले तरी हाच प्रकार. पण मग त्यामुळे ना ही मुले संवाद साधण्याच्या दृष्टीने कमी पडत जातात. कोणाशी काय आणि कसे बोलायचे हे त्यांना कळतच नाही. कारण विषय पण समजत नाही त्यांना. यामुळे कुठे जायची त्यांना इच्छा नसते. कोणी घरी आलेले नको असते. हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. शाळेतील डीबेटस् मधे काय की इतर विषयांवर चर्चा करण्यात कमी पडतात. पण मग आपल्याला एखाद्या विषयावर बोलता येत नाही, यांचा मनात कुठेतरी न्युनगंड निर्माण होतो जातो. 

म्हणून तर मग एखाद्या मार्गदर्शकाची मदत घ्यावी लागते. 

मला काय वाटतं, या अशा सगळ्या भानगडीत पडण्यापेक्षा घरात नियम केला पाहिजे, काही अगदीच गरजे पुरता मोबाईलचा वापर करावा. सगळे एकत्र आले की मग तो बाजुला ठेवून मस्त वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली पाहिजे. गंमतीत सांगायचे तर रोज गोलमेज परिषद (Round Table Conference) भरली पाहिजे घरात. आणि या परिषदेत घरातील प्रत्येकाची सहभागी असली पाहिजे, याची खात्री करा हं. शिवाय थोडं थोडं का होईना पण प्रत्येकाला बोलते केले गेले पाहिजे.

मला माहीत आहे, एकदम बदल घडवणे शक्य नाही. पण हळूहळू करत  रोजे रूटीन बनवत गेले तर अशक्य असे काहीच नाही. 

काय मग भरवायची गोलमेज परिषद आपापल्या परीने आपापल्या घरी? 


सौ अर्चना शिशिर दीक्षित 

बुधवार, १० मे, २०२३

मी सौंदर्यवती (१०ऑनलाईन गेम)

 मी सौंदर्यवती 


बच्चा भी खेले, बच्चे का पुरा खानदान खेले...

आता ही एक नवीनच फॅशन. आपण सगळे आधी सुट्टी मिळाली की आजी आजोबा सगळे मिळुन सापशिडी, लुडो, पत्यांचे विविध प्रकार, असे घरात बसल्या बसल्या खेळ खेळायचो. किंवा कधी बॅडमिंटन, टिकरी, लंगडी, विटीदांडू असे अनेक खेळ खेळायचो. पण आता तेच सगळे खेळ कंप्युटर वर खेळायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक खेळ घरात काय एका खुर्चीवर बसून खेळता येऊ लागले आहेत. त्यात घरातील सर्व मंडळी सहभागी होताना देखील दिसतात. अहो कंप्युटर काय पण फोनवर सुद्धा ही सोय झाल्याने घरातील प्रत्येक व्यक्तीला अगदी तोंड वर करून संवाद साधायला देखील वेळ नाही असं झालं आहे. बरं त्यामुळे एकमेकांमध्ये संवाद पण असेच सुरू असतात. 'अहो ऐका ना परवा ना आपल्याकडे माझी किट्टि आहे बरका. मला एखादा छानसा गेम सुचवा ना. मागच्या महिन्यात त्या चौधरी वहिनींनी एक खेळ घेतला होता. बाईग उभं राहून पाय दुखायला लागले आमच्या बायकांचे. त्यांच्या समोर कोणी बोललं नाही. पण... जाऊदे काय सांगायचं म्हणा. पण तुम्ही मला फोनवर खेळता येईल असा खेळ सांगा हो. आजकाल फॅशन आहे हो याचीच. रहावं लागतं बाबा फॅशनप्रमाणे.‌ नाही तर सगळे ऑर्थोडॉक्स म्हणतात.' नवरा पण लगेच ढिनच्याक खेळ सुचवून मोकळा होतो.

हं इकडे पुरुष पण काही कमी नाही. ते देखील तितकेच या ऑनलाइन खेळात सहभागी होत असतात. जरा निवांतपणा मिळाला की लगेच गेम सुरू करून मग्न होऊन जातात. चुकून जरी कोणी आवाज दिला तर, ' अबे रुक आ रहा हूं यार. इतना गेम खतम होने दे. मग येतो. काय यार तिकडे बायको, इकडे तू मला आवाज देऊन देऊन बेजार करता राव. एक गेम पूर्ण करू देत नाहीत.' 

इतकेच काय तर लहान लहान मुले सुद्धा यांचे शिकार झाले आहेत. त्यांच्यासाठी एक्स बॉक्स सारखे वेगवेगळे खेळाचे गॅजेट्स घरात येऊ लागले आहेत. काही आई वर्गाला या खेळाविषयी माहिती नसते. त्यामुळे या काय आऊट डेटेड आहेत, असे म्हटले जाते. त्या देखील बिचाऱ्या अज्ञानी समजून बुजतात. तर काही आई वर्ग म्हणजे 'ए जा रे बाबा हा घे मोबाईल. मी हा गेम डाऊनलोड केला आहे. जा बस तिकडे खेळत. आणि माझ्या डोक्याशी भुणभुण करू नकोस'. असं म्हणत मुलांना गप्प करतात. 

काही आजी आजोबा देखील नातवंडांच्या हट्टाला दुजोरा देत असतात. इतरांना देखील मोठ्या फुशारकीने सांगत असतात. ' अहो आमचा नातु कौशल ना काय पटापट ऑनलाईन गेम्स खेळत असतो. त्याला सगळं माहीत आहे कसं डाउनलोड करायचं वगैरे. आजकाल आम्ही पण त्यांच्याकडे धडे घेतो. आणि खेळतो बरं का. म्हातारपणी तेवढाच आपला विरंगुळा हो. ' असं म्हणत हसत राहतात. 

पण काही घरांमध्ये या बाबतीत वाद असतात. आईचे म्हणणे असते, ' नको या नादाला लागू बाळा. हे एक प्रकारचे व्यसन आहे. याच्या आहारी जाणे योग्य नाही. थोडा वेळ खेळणे गोष्ट वेगळी आहे. पण तासंतास नाही रे घालवू. आयुष्याचे नुकसान होईल. त्यापेक्षा आपण ते तुझ्या आवडीचे पुस्तक आणले आहे, ते वाच ना राजा.'  अशा वेळी बाबांनी आईला साथ दिली तर पाल्य तिथेच सुधारू शकतो. पण वडील जर मागुन गेम खेळण्यासाठी परवानगी देत असतील तर आई हतबल होऊन जाते. आईच्या समजावून सांगण्याला, रागवण्याला काही अर्थच राहत नाही. घरात अजून क्लेश वाढण्यापेक्षा, अजून वाद निर्माण होऊ नये म्हणून आई गप्प बसते. 

या नसत्या फॅशनच्या आहारी न जाता आपण सर्वांनी मिळून यावर वेळीच योग्य उपाय करणे खूप गरजेचे आहे. मुलांचा वाचनाकडे, मैदानी खेळांकडे कल वाढवला पाहिजे. थोडा वेळ त्यांच्याबरोबर आभ्यासाविषयी चर्चा केली पाहिजे. आणि इतरांना सल्ले देण्यापेक्षा स्वतःच्या घरातून ही सुरुवात झाली खरा अर्थ आहे. 


मी सौंदर्यवती (९भाषा)

 मी सौंदर्यवती (९, भाषा)


'भाषासु मुख्या मधुरा'


'ओ गॉड, व्हॉट टु डू बाई, कळतच नाही मला.  दिज डेज ना या मुली, कान्ट हेल्प इट इज बाई.'

हसु आलं ना हे वाचुन. पण अहो आजकाल फॅशन झाली आहे, दोन तीन भाषांमध्ये संवाद करण्याचा. त्यामुळे समज, गैरसमज पण होत असतात. काही लोकांना वाटते, ही काय उगाच शाईन मारते. काही लोकांना वाटते ह्याला धड एका भाषेत बोलता येत नाही. 

मला माहीत आहे कोणत्याही एक भाषेत योग्य संवाद साधला गेला पाहिजे. भाषांची सरमिसळ होऊ नये. त्यासाठी लहानपणापासून घरात मात्रुभाषा पाल्याला शिकवली जावी. सगळं मान्य आहे. पण काय होते कधी कधी काही कारणांमुळे आपण दुसऱ्या प्रदेशात किंवा दुसऱ्या देशात स्थायिक होतो. त्यावेळी आजुबाजुला वेगवेगळ्या भाषा बोलली जाते. ती त्या पाल्याच्या कानावर पडत असते. आणि मग अनेक वेळा इतर भाषा कानावर पडत राहिल्याने मुले देखील कधी कधी काही शब्द इतर भाषेतील बोलायला सुरुवात करतात. 

शिवाय इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षक पालकांना खास बोलावून घरात संवाद इंग्रजी मधेच साधावा असा हट्ट धरतात. त्यामुळे काही पालक ज्यांना नीट इंग्रजी बोलता वाचता येत नाही, ते गोंधळून जातात. पण आपण नीट शिकलो नाही आणि मुलांनी मात्र छान फाडफाड इंग्रजी मधेच बोलावं, असं त्यांना वाटतं. आणि एका अर्थाने त्यांच्या दृष्टीने ते बरोबर देखील आहे. कोणाला नाही वाटत आपण जे करु शकलो नाही, ते ते मुलांनी करावं. यासाठी कोणतेही पालक धडपड करतील. त्यातल्या त्यात जवळपास असणारी चांगली शाळा शोधून, आपल्या खिशाला परवडेल अशी शाळा शोधून, तिथे पाल्याला दाखल करुन समाधानी होतात. 

आणि काही जण आपलं स्टेटस जपलं जावं, यासाठी आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेत असतात. नाही तर लोकं काय म्हणतील असं त्यांना वाटत असते. मग घरात पण इंग्रजी मधेच संवाद सुरू होतो. पण त्यात कुठे नातलगांकडे गेले किंवा कोणी घरी आले की पाल्याची धांदल उडते. कारण काही जण म्हणतात, ' काय रे किंवा काय ग इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातेस ना, मग बोल बरं इंग्रजी मधे. का, नाही जमत बोलायला? आई बाबा तुझ्याशी इंग्रजी बोलत नाही का?  आमची चित्रा अगदी फाडफाड इंग्रजी बोलते बरका. तिच्या बरोबर आम्ही नेहमीच इंग्रजीमध्ये बोलतो.'

तर काही जण याच्या विरोधात असतात. ते म्हणतात, ' अरे देवा याला/हिला आपली मातृभाषा येत नाही का? असं कसं चालेल? आपली मातृभाषा आधी आलीच पाहिजे. इंग्रजी काय नंतर पण शिकु शकतो. आपण शेवटी विचार तर आपल्या मातृभाषेतच करतो ना? आम्ही तर घरात फक्त आपल्या मातृभाषेतच बोलतो बरका. शाळेतील शिक्षक काय, ते आपले काही तरी बोलतच असतात. पण आपणच ठरवायचं आपल्या पाल्याला काय शिकवायचे ते.' 

ज्या कुटुंबात इंग्रजीचे ज्ञान असते, त्यांना खूप फरक पडत नाही. पण ज्या कुटुंबात इंग्रजीचे ज्ञान नसते, त्यांना कुठेतरी न्यूनगंड निर्माण होतो. तर काही जण मात्र या सर्व गोष्टींचा फारसा फरक पडू देत नाहीत. 

या सर्व गोष्टींचा त्या निरागस पाल्यावर नकळत परिणाम होत असतो. त्यांना कोणत्या भाषेत संवाद साधावा, या विषयी मनात संभ्रम निर्माण होतो. त्यात खरोखर पालक खमके असतील, तर काही फरक पडणार नाही. त्यातुन देखील काही शब्द इतर भाषेतील बोलले जातात. यात आजुबाजुला वेगवेगळ्या भाषा कानावर पडल्यामुळे देखील हे होऊ शकते. पण यावर हसणारे पण अनेक असतात. हां वाक्याच्या वाक्य जर कोणी धडगुजरी बोलत असतील , तर हसण्यापेक्षा, त्यांना व्यवस्थित समजावून सांगितले तर चांगले आहे. एखाद् दुसरा शब्द इतर भाषेतील बोलला गेला, तर टिंगल करायची काही गरज नसावी, असं मला वाटतं. 

सगळ्या महत्वाचे म्हणजे काही करून संवाद साधला जावा. त्या त्या भाषेचा मान राखला जाईल, याची काळजी घेतली जावी असेही मला वाटते.


मी सौंदर्यवती (८नो बॉडी शेमींग)

 "वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळ"

मी नेहमीच माझ्या लेखणीतून सांगत असते ना फॅशनचे काय, ती कशाची पण असते. त्यात काही महाभाग व्यक्तींना उगाच खाज नावाची फॅशन असते. म्हणजे समोरच्या व्यक्तीला वस्तुला नाव ठेवत रहायची. अहो ही आजकाल फॅशन होत चालली आहे. यात काय फुशारकी आहे कोण जाणे. पण दुसऱ्याला नावं ठेऊन, त्यांच्यावर हसुन यांना काय मजा येते देव जाणे. 

यात अगदी मोठ्यांपासून लहानांपर्यंत सहभागी असतात.

या विकृतीला आत्ताच्या फॅशनप्रमाणे "बॉडी शेमींग" म्हणतात.

' ए मंगेश इकडे ये पटकन तो बघ तो बघ तुंदिल तनु चालला आहे. बापरे मला तर एकदम जमिनच हादरल्या सारखी वाटली रे. यार याला म्हणा, जरा स्विमिंग वगैरे कर ना भो. ए ए ऐक ना, पण  हा स्विमिंग पुलमध्ये आख्खं पाणी बाहेर उडवत असेल. हो ना?  काय रे तुला काय वाटतं. जाऊ दे राव आपल्याला काय.' यावर मंगेश देखील दुजोरा देत म्हणतो, ' हो ना  भाऊ, याचं ना काहीच नाही होऊ शकत. नुसता फुगत चालला आहे राव. फुग्यात हवा भरत चालल्या सारखा.'  आणि मग एकमेकांच्या हातावर टाळी देत हसत बसतात. 

लहान मुले तर आई वडील जे चर्चा करत असतात, ते किंवा त्यातले अर्धवट ऐकून बोलत असतात. 

'ए रवी तुला माहीत आहे का, माझी आई ना त्या किरणला ना टोण्या किंवा कधीकधी लोद्या म्हणते.'  रवी न कळल्याचा आविर्भाव करत विचारतो व, ' का रे असे का?' 'अरे तो कसला जाडा आहे पहा ना.' असं म्हणत हसत राहतात. 

बायका पण आपापसात कुजबुजत असतात. ' अहो निर्मला वहीनी, काय म्हणता? अनेक दिवसांत दिसलात. अय्या, एवढ्यात फारच वजन वाढलं आहे ना तुमचं. बाई ग काही तरी करा बरं का वजन कमी करण्यासाठी. त्या चौगुले वहीनी अशाच वारल्या हो काही महिन्यांपूर्वी. वय काय फारसं नव्हते त्यांचे. साधारण तुमच्या म्हणजे आपल्याच वयाच्या होत्या त्या.' 

हे असं म्हणून आजारी नसलेल्या व्यक्तींना आजारी करतात. किंवा त्यांचे म्हणणे ऐकून न घेता केवळ काही तरी बोलायचे म्हणून असले काही तरी बोलत रहायचे, ही सवयच असते काहींना. 

कधी काळी भेटून असले ताशेरे ओढण्यात काय अर्थ आहे हो. त्यापेक्षा कधी समोरच्या व्यक्तीला जाणून घेण्यासाठी प्रयत्न केले आहेत का? चटकन एखाद्याला लागेल असे बोलून, त्या व्यक्तीला दुखावण्यापेक्षा त्यांना समजावून घेणे गरजेचे आहे. काही आजारामुळे किंवा इतर काही कारणांमुळे समोरची व्यक्ती कोणत्या मानसिक अवस्थेत आहे, हे जाणून न घेता, त्यावर टिका करत रहाणे, खुपचं चुकीचे आहे असे नाही का वाटत? 

त्यापेक्षा आपण देखील एक व्यायामाची दिनचर्या बनवून, त्यात त्यांना समजावून घेऊन न कळत सहभागी करून घेतले तर, त्यात आपला पण फायदा होईल आणि सामाजिक जाणीव ठेवून समोरच्या व्यक्तीचा देखील फायदा होऊ शकतो. आपणच एक साखळी या निमित्ताने बनवु शकतो. आपल्या आसपासच्या परिसरातील पाच व्यक्तींना प्रोत्साहन देऊ शकतो. आणि त्यांना प्रत्येकी पाच , असे करत ही  साखळी मोठी तयार होऊ शकते. यात आपल्या सकट प्रत्येकाच्या आयुष्यात एक शिस्तबद्धता येऊ शकते. 

काय मग लावणार ना हातभार?


मी सौंदर्यवती (७पैशांची उधळण)

"अंथरुण पाहून पाय पसरावे"


मग काय तर अहो खरच आहे हे. उगाच आजकालची फॅशन असं म्हणत काही करत राहणे बरोबर नाही की हो. मी नेहमीच माझ्या लेखणीतून सांगत असते तसेच. फॅशन काय कोणत्याही गोष्टीची, कुठल्याही प्रकारची, कुठल्याही विषयावर असु शकते हं. 

तर आजचा विषय आहे लग्न. अहो लगेच लिस्ट कसली करताय. ऐका तर, ओह वाचा तर आधी. 

लग्न म्हणजे अगदी स्पर्धेची प्रथा  बनत चालली आहे. जो येतो त्याला वाटत असते, लग्न म्हणजे एकदम थाटामाटात साजरे केले गेले पाहिजे.

घरातील चर्चेला उधाण येते. ' अहो बरका, मी काय म्हणते आज संध्याकाळी फिरायला न जाता आपण ना त्या जवळपासच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे जाऊन येऊ.' ह्यांना पडतो मोठा प्रश्न, ' का ग आज का आणि एकदम इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे वगैरे. एव्हढे काय मोठे आयोजन करायचे आहे? ' इश्श्य अहो असं काय करताय आपल्या महेशच्या लग्नाची तारीख ठरवायची आहे ना. मग जायला नको त्यांचे कोटेशन घ्यायला? काय बाई तरी, अहो आजकाल फॅशन आहे एक दिड वर्षाच्या आधीच हॉल बुक करावा लागतो आणि या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे जाऊन छान छान आईडीया घ्याव्या लागतात. शिवाय केटरींग वाल्याची देखील वेळ घ्यावी लागते बरं का. मला तर ना सगळ्या प्रकारचे मेनू ठेवायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक खाण्याच्या पदार्थांची चव घेऊन त्यानुसार ऑर्डर द्यायची आहे हो. मागे एकदा असंच झालं ना. ते पलिकडच्या गल्लीमध्ये सुनिल भाऊजी आहेत ना. आठवतंय का काय गम्मत झाली होती, त्यांच्या मुलाच्या लग्नात? त्यांनी चवी बघितल्या नाहीत, मग काय धिरडं बिघडलं. अहो म्हणजे भलतीच प्लेट मेक्सिकन पदार्थ म्हणून ठेवली. सुनिता वहीनी मुठ गिळून गप्प बसून राहिल्या त्यामुळे. म्हणून आपण शहाणे होऊन आधीच योग्य पावले उचलली पाहिजेत बरं का ' 

तर काही ठिकाणी चर्चा वेगळीच असते 'अहो ऐकताय का? येत्या १/२ वर्षात आपल्या मनोजचे लग्न करायचे आहे ना. आपल्या सगळ्या नातेवाईकांना आपण बोलवू हं. तुमच्याकडेच, माझ्याकडचे. आणि अलिकडच्या काळातील फॅशनप्रमाणे चांगले १०/१२ दिवस कार्यक्रम आयोजित करूयात.'  अहोंचे तर डोळेच गरगरतात. ' अगं बाई ही कसली  फॅशन? लग्न कधी इतके दिवस चालते का? आदल्या दिवशी सिमांती पुजन आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हळद मग मुहूर्तावर लग्न बास. अजून काय करायचंय. आपण आपल्या वरिष्ठांना विचारात घेऊन त्यानुसार योग्य मार्गदर्शन घेऊन प्रथे, परंपरेनुसार छान लग्न लाऊयात ना. आणि तसंही अजून खूप अवकाश आहे ग. '  'बाई बाई बाई, अहो आजकाल काय फॅशन आहे हे त्यांना नाही कळत हो. आपण करू ते काय रूढी बिढीप्रमाणे. पण जरा आजकालच्या पद्धतीनुसार ' 

'अग  पण खर्चाचा विचार केला आहेस का? उगाच पैशांची उधळण आहे ही. आणि चक्क मनोजला आणि मधुरीमाला साध्या सोप्या पद्धतीने लग्न करायचं आहे ग. उसने काढून सण कशाला साजरा करायचा? आपण आपले अंथरूण पाहून पाय पसरावे, असं मला मनापासून वाटते.

आणि मी काय म्हणतो हेच उरलेले पैसे आपण मुलांसाठी राखुन ठेऊयात ना. खरे तर आता परत जून्या परंपरा हीच लेटेस्ट फॅशन झाली आहे. '  

चक्क बायकोला पण हे नीट समजून सांगितले म्हणून व्यवस्थित पटते देखील. आणि मग जुनं ते सोनं म्हणत घरातले सगळे एकमत होऊन फॅशन आणि परंपरेची सांगड योग्य रीतीने घालून योग्य निर्णय घेतात. त्यामुळे घरात देखील एकोपा कायम राखला जातो. 


मी सौंदर्यवती (६सेल्फी बिल्फी)

सेल्फी बिल्फी

नो डाऊट, जस्ट पाऊट


काय फॅशन आहे राव ही आजकाल? या फॅशनचे जन्मदाते कोण आहे, देव जाणे. बस संधी मिळाली की बॅगेतून फोन बाहेर येतो आणि सेल्फी काढायला हात पुढे सरसावलेले दिसतात. आणि चुकून जरी कोणी म्हटलं की मला नाही येत सेल्फी घेता. झालं, पुढचे काही क्षण त्या व्यक्तीचे शाब्दिक क्लासेस सुरू होतात. 'अय्या तुला सेल्फी घेता येत नाही. कशी ग बाई तु. किंवा कसला आहेस यार तु. कुठल्या जमान्यात वावरत असतोस. ही एकदम लेटेस्ट फॅशन आहे ना. मग तुझ्या स्मार्ट फोनचा काय उपयोग. किंवा अगदी चुल्लुभर पानी में डूब जा.' असं देखील म्हटलं जातं.

या सेल्फी साठी लोकं संधीसाधू प्राणी झाले आहेत. आज काय तर सूर्योदय मस्त दिसत आहे. मग पार्श्वभूमीवर सूर्य आणि पुढे आपण उभे राहून, आपला फोटो डार्क आला तरी चालेल पण पाऊट करून फोटो सोशल मीडियावर सूर्य डोक्यावर यायच्या आत हा फोटो गेला पाहिजे याची जणू स्पर्धाच सुरू होते. 

मग काय तर, पहीला चहाचा कप हातात घेऊन त्या कप जवळ पाऊट करून फोटो काढून स्टेटस अपडेट करण्यात येते. बरेच वेळा या नादात ओठाला चटका बसतो, पण पावट्याचा, हे हे म्हणजे त्या पाऊट चा फोटो काढणं जणू अगदी गरजेचे असल्यासारखे वागत असतात. 

कधी काय तर म्हणे टुडे इज माय बर्थडे, विष मी हॅपी बर्थडे, असं म्हणत केक कट करून त्यांचा तुकडा हातात घेऊन पावटा फोटो घेणार. मग अय्या दादु हॅपी बर्थडे असं म्हणत धाकटि बहीण तोच केक दादुला फासणार. मग पावट्याजवळ जाऊन पाऊट करून फोटो घेणार आणि स्वतःच्या इन्स्टाग्रामवर टाकणार.

इतकेच काय तर बायका पुरुष देखील तितकेच या भलत्या फॅशनच्या आहारी गेलेले दिसतात. संध्याकाळी फिरायला जातात आणि तिथे आपल्या आजूबाजूला असलेल्या इतर महिलांना एकत्र करून ग्रुप सेल्फी साठी उत्साहाने सहभागी होताना दिसतात.  अनेकदा फिरणं बाजूला राहून जाते पण सेल्फीची संधी कोणी चुकवत नाहीत. 

पुरुष देखील अबे चल ना आज का दिन सेलिब्रेट करते है, माझं प्रमोशन झाले आहे ना. ऑफिसमध्ये काम करत असल्याने कॉफीचा कप हातात घेऊन चिअर्स म्हणून पाऊट करुन सेल्फी घेऊन बायकोला तो फोटो पाठवून बातमी कळवतात. 

घरगुती समारंभात देखील सगळे एकत्र येऊन आधी त्या सेल्फी करता अक्षरशः जीव कासावीस करतात. दात नसलेली आजी सुद्धा मग पाऊट करुन तयार असते. 

हे सर्व गमती जमती पर्यंत ठीक आहे हो. पण या सर्व गोष्टींचा जेव्हा अतिरेकी व्हायला लागला की त्याचे चुकीचे परिणाम होताना दिसतात.

रस्त्यावर मधेच उभे राहून आजुबाजुला गाड्या येत असताना देखील सेल्फी साठी उतावळे होत असतात. त्यात कधी हातातून फोन सटकून रस्त्यावर पडतो आणि फोनचे दोन तुकडे होतात. 

काही जणं शाळा, कॉलेज चुकवून समुद्र किनारी फिरायला जातात. तिथे लाटा जिथे सर्वात जास्त उसळत असतात त्यांच्या जमेल तेवढे जवळ जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असतात. जणू ती लाट आपल्या डोक्यावर आणि आपण दिमाखात उभे राहून फोटो काढून घेण्याच्या प्रयत्नात असतात. तिथे ड्युटीवर असलेले पोलीस जीव काढून त्यांना समजावून सांगत असतात. पण या मामु लोकांना काही समजतं का आजकालच्या फॅशनचे असं बोलून आपली सेल्फी काढण्यात अगदी मग्न होऊन जातात.  यात फोन किंवा व्यक्ती त्या लाटेच्या ओघात वाहत जाताना दिसतात. घरी पालक आपल्या एकुलत्या एक मुलाची वाट पाहत बसतात.

काही जण खास ट्रेकिंगला जातात. तिथे मिळेल, दिसेल किंवा वाटेल त्या ठिकाणी थांबून सेल्फी काढत असतात. ही यातली काही पावटि पोरं किंवा यांच्या नादाला लागलेल्या पावट्या पोरी, अहो म्हणजे पाऊट करुन सेल्फी काढणारा समुदाय, डोंगर माथ्यावर अशा ठिकाणी थांबून सेल्फी काढत असतात जिथून सेल्फी काय पण ते सेल्फ पण परत येऊ शकत नाहीत. 

तेवढ्यासाठी वाटते हो हे सेल्फी बिल्फी, पाऊट वगैरे एका मर्यादेपर्यंत ठिक आहे हो. पण अतिरेकी पणा व्हायला लागला की परिणाम चुकीचे होऊ शकतात, याची जाणीव असावी, एव्हढेच वाटते बरं का.


सौ अर्चना शिशिर दीक्षित 


मी सौंदर्यवती (५पेढे खाऊ शंभर)

'पेढे खाऊ शंभर,

पहिला माझा नंबर'

आजकाल ना फॅशनच झाली आहे आपला मुलगा किंवा मुलगी सर्वात पुढे असावी. प्रत्येक स्पर्धेत त्यांनी सहभागी होऊन पारितोषिके जिंकून आणावीत. यासाठी धडपडत असतात. शिवाय त्याकरता शाळेची वेळ सोडून उरलेल्या वेळात भरमसाठ क्लासेस लाऊन ठेवतात. मग आपल्या पाल्याला जेवायला वेळ मिळतो की नाही, आत्मचिंतन करायला किंवा आत्मपरीक्षण करायला वेळ मिळतो की नाही, पाल्याला नेमके काय करायचे आहे, याचा विचार न करता आपले विचार त्यांच्यावर थोपवून पाल्याला पटवून सांगत असतात.

'अरे गंधार बाळा, उद्यापासून ना मी तुला गणित, विज्ञान आणि कंप्युटरच्या क्लास लावणार आहे. तुला पुढे इंजिनिअर व्हायचे आहे ना. मला माहीत आहे तु ह्या विषयांमध्ये ठिक आहेस. पण बाळा आजकाल फॅशन आहे ना हे देखील क्लास लावायची. तो गोरे वहिनींचा गौरव पाहिला ना. काही क्लास लावले नाही.  मग बसलाय ९० टक्केच मिळवून. आणि मग कॉमर्स किंवा आर्टस् ला जाईल.  हे पहा तुला त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळाले पाहिजे बरं का. तुला किमान ९६/९७ टक्के आलेच पाहिजे हं. आपल्या कडे सगळ्यांनी सायन्स ग्रॅज्युएशन केलं आहे बरं का. ह्या इतर विषयांमध्ये भविष्य नाही रे काही. मला आता बाकी काही ऐकून घ्यायचं नाही.' 

हे वातावरण घराघरांत झाले आहे.  आपल्या पाल्याला काय करायचे आहे काय शिकायला आवडेल, त्यांची क्षमता किती आहे, कोणत्या क्षेत्रात त्याला पुढील वाटचाल करायची आहे. या सर्व गोष्टी विचारात न घेता आपले विचार आपल्या इच्छा, आकांक्षा त्यांच्यावर थोपवून कितीतरी पालक  मोकळे होतात. विज्ञान किंवा सायन्स हिच शाखा कशी योग्य आहे आणि इतर विषयांना कमी लेखून सतत घरात संवाद सुरू असतात. 

किती वेळा ते पाल्य आपल्या पालकांना सांगण्याचा प्रयत्न करत असतात, 'आई अगं मला सायन्समध्ये ग्रॅज्युएशन नाही करायचं ग. मला कॉमर्स साइडला जाऊन सी.ए. व्हायचे आहे. काही दिवस एखाद्या फर्म मध्ये छान अनुभव घेवून मग स्वतःची फर्म सुरू करायची इच्छा आहे.  तु आणि बाबा नका ना माझ्या मागे लागु सारखं सायन्स कर, सायन्सच कर म्हणून. मला झेपणार पण नाही ते. उगाच सायन्स घेऊन त्यानुसार फॅशन आहे, असं नका ना मला समजावून सांगु. आणि असं काही नाही की इतर विषयांमध्ये तुम्ही काही पुढे करु शकत. ते म्हात्रे काका बघ की , त्यांची पण तर स्वतःची फर्म आहे. कसलं मस्त सुरू आहे ना त्यांचं पण. मी किती वेळा त्यांना विचारत असतो, या विषयावर. आई बाबा आता जग बदलले आहे. आपण किती वेगवेगळ्या विषयांत ग्रॅज्युएशन करु शकतो. आणि शिवाय त्यात संधी पण उपलब्ध आहेत.' 

त्यावर क्षणाचा विलंब न करता पालक खड्या आवाजात ऐकवतात, ' अरे गप रे बाळा, तुला ह्या विषयांमध्ये काही समजत नाही. आम्ही जे सांगत आहे ते ऐक. तु स्वतःची अक्कल पाझरू नको उगाच.' 

मग काय हे बाळ या फॅशनच्या आहारी पालकांकडून बळी पडतात. एखाद्या दडपणाखाली राहून कसं बसं शिक्षण पूर्ण करतात. पण काही जण हे दडपण झेलु शकत नाहीत. मग त्याचे दुष्परिणाम देखील होतात. पाल्य नको ती पावले उचलुन आपल्या आयुष्याची पार वाट लावतात. आणि मग नंतर हेच पालक निराश, हताश होऊन जगतात. 

म्हणून तर वाटते ना नको त्या फॅशनच्या फंदात पडून आपण आपले आणि आपल्या पाल्याचे भविष्य खराब करत असतो. त्यापेक्षा वेळेवर त्यांची क्षमता, आवड , कल लक्षात घेऊन त्यानुसार त्या विषयावर योग्य माहिती गोळा करून आणि घरात व्यवस्थित चर्चा करून मगच तोडगा काढावा. आपले पाल्य चुकीचे आहे, त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचाच आहे, यापेक्षा त्यावर नीट विचार करून निर्णय घेतला पाहिजे. हां चुकीचा मार्ग निवडून पाल्य वागत असेल तर नक्कीच योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. 

पाल्याला ज्या विषयांमध्ये प्राविण्य मिळवायचे त्या विषयाची योग्य माहिती गोळा करून त्यानुसार त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात देखील ते कसे पारंगत होऊ शकतात, यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले तर त्या क्षेत्रात नक्कीच ते योग्य मार्गाने प्रगती करू शकतात. 

आपण त्यांना पंख देऊन त्या पंखांना योग्य विचारां, आचारांचा आहार देऊन मजबूत करायचे असते. दिशाभूल होण्यापेक्षा योग्य दिशा दाखवायला हवी. पण पंख आपल्या हातात अडकवून त्यांची उडण्याची क्षमता हेराऊन नाही घेऊ. आपल्या हाताच्या दबावामुळे पंख तिथेच फडफडवून त्यांची गगन भरारी थांबवणे कदापि योग्य नाही.

शेवटी एवढंच म्हणावेसे वाटते...

"आकाशी झेप घे रे पाखरा, आकाशी झेप घे रे पाखरा

सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा"


सौ अर्चना शिशिर दीक्षित 


मी सौंदर्यवती (४झगमग झगा)

 'झगमग झगा नी मला कोणी बघा'

किती तरी वेळा आपल्या आयुष्यात असे इसम येत असतात. ज्यांना काहीही करुन लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचे असते. मग त्यासाठी आपण काय कपडे घालून फिरतो, ते आपल्याला योग्य दिसत आहे का नाही याचा विचार पण बहुदा त्यांच्या मनात येत नसावा. 

परत विषय फॅशन हाच आहे बरका. मला मान्य आहे आपल्याला आजकालच्या फॅशनप्रमाणे राहण्याची इच्छा असते. त्याप्रमाणे पेहराव करायची इच्छा असते. एखाद्या टिव्ही सिरीयल मध्ये कोणी काही विशिष्ट प्रकारचे कपडे घातले असतील तर आपल्याला पण लगेच बाजारात जाऊन ते आणि तसेच खरेदी करायची इच्छा असते. आश्चर्य म्हणजे बाजारात देखील तसे कपडे त्या काळात उपलब्ध असतात हो. हे दुकानदार कधी बरं सिरीयल बघत असतील आणि कधी ही खरेदी करत असतील देव जाणे. किंवा हाहा असंही असेल म्हणा त्यांच्या घरातील इतर व्यक्ती हे काम नेटाने करत असतील. त्या  वेळी

बहुदा तेच असे कपडे विक्रीसाठी आणावे , याचा सल्ला देत असावेत. 

गमतीशीर आहे ना.

घरात लगेच चर्चा सुरू होते, "अहो बरका त्या आठ वाजता सिरीयल मध्ये नाही का ती सुन जी झाली आहे ना तिने ना छान जॉर्जेटची साडी नेसली आहे. ऐका ना या वर्षी माझ्या हॅपी बर्थडे टू यू ला पण तशीच साडी आणुयात ना. अहो आजकाल यांची खुप फॅशन आहे ना. आमच्या भिशीच्या ग्रुपमध्ये सगळ्या बघतच राहतील. हो की नाही ओ. आणि तसाच म्हणजे त्याच प्रकारच्या कापडाचा ना मी आपल्या मिनलसाठी ड्रेस घेणार आहे हो. आणि मग मस्त फोटो काढून Like Mom Like Daughter म्हणत शेअर करणार आहे.  हो मी ठरवले आहे तुमच्या आणि मयुरसाठी पण आपण नऊच्या सिरीयल मधला तो ओम्या आहे ना त्यांच्यासारखाच मळखाऊ शर्ट घेऊयात. अहो आजकाल फॅशन आहे. तुम्ही पण तसाच फोटो काढून Like Father Like Son असा फोटो काढून घ्या ना. आणि टाका सोशल मीडियावर. अहो परवाच मी विवेक भावजींचा त्यांच्या मुलगा अमोघ बरोबरचा फोटो एफ् बी वर बघितला हं."

इतकेच काय पण घरातील सणासुदीला, सणवाराला देखील फक्त प्रादेशिक नाही तर इतर प्रांतीय पेहराव करायची पद्धत सुरू झाली आहे. विशेष म्हणजे अशावेळी अगदी मनापासून किंवा बारकाईने लक्ष देऊन या सर्व गोष्टी मध्ये लहान, मोठे, तरूण किंवा वयस्कर मंडळी देखील सहभागी होताना दिसतात. काही जण चक्क एखाद्या फॅशन एक्सपर्टचा सुद्धा सल्ला घेतात. ते एकाप्रकारे योग्य देखील आहे. कारण अंगापेक्षा बोंगा दिसण्यापेक्षा योग्य सल्ला घेऊन योग्य पेहराव केलेला केंव्हाही छान. हो की नाही.

शिवाय या बाबतीत कोणी कोणाची बरोबरी करू नये असे माझे वैयक्तिक मत आहे. त्याला किंवा तिला त्या त्या प्रकारचे कपडे छान दिसतात. म्हणून आपण देखील तसेच ट्रेंड्स करावे किंवा ती बरोबरी करुन आपले हसू करून घेऊ नका बरं का.

पुरुषांना पण ही मजा घेता यावी किंवा आपण देखील मागे राहू नये म्हणून किंवा घरात शांती हवी म्हणून पुरुष देखील तितकेच उत्साहाने सहभागी होताना दिसतात. एकुण काय तर आजच्या काळात सगळ्यांनाच आपलं टेंशन विसरून प्रत्येक गोष्टीत आनंद घ्यायचा असतो. ते योग्य देखील आहे. 

कारण प्रत्येक जण कामाच्या व्यापात व्यस्त आहेत. कौटुंबिक मजा मस्ती अनेकदा शक्य होतेच असं नाही. म्हणून तर मग अशी संधी साधून पुन्हा आपला उत्साह वाढवून नव्या जोमाने कामाला लागतात. 

असेही किती जण आहेत जे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टित समाजाचे देखील भान ठेवतात. घरी काम करणाऱ्या मावशींना कधी पगारा बरोबर समारंभाला किंवा सणासुदीला छान छान आणि त्यांना काय योग्य दिसेल, ते काय घालुन कंफर्टेबल असतील याचा सुद्धा विचार करून कपडे देऊ करतात. आणि सांगतात,  "सखुमावशी यावेळी मी तुमच्या सर्वांसाठी मॅचींग कपडे आणले आहेत हं. अहो आजकाल फॅशन आहे मावशी. फॅशन काय फक्त काहींनीच करायची, असं कुठे असतं. तुम्ही पण छान हे कपडे घालून झकास फोटो काढून घ्या हं तुमच्या छकुली कडुन."

त्या सखुमावशीच्या डोळ्यातील पाणी सर्व भावना व्यक्त करतं मग. 

पॉंईंटाचा मुद्दा काय तर समाज भान ठेवून समाजाला बरोबर घेऊन जे करता येईल ती खरी फॅशन हो. 


 

मी सौंदर्यवती (३पावरी)

 "ये मै हूं, ये मेरे घरवाले, ये पिछे हमारा पूरा परिवार है, और हमारी पावरी हो रही है| 

हमम आठवला ना हा व्हिडिओ. अहो नक्कीच पाहिला असणार, आपण सर्वांनी. हा व्हिडिओ किंवा आजकालच्या भाषेत रील सोशल मीडियावर फारच प्रसिद्ध झाला होता. आणि तो पाहून पार्टी होत नसेल तरी सोशल मिडियाचे प्रेशर म्हणून देखील खास घरगुती समारंभ आयोजित करून असा रील बनवून किती कुटुंब सोशल मीडियावर टाकत खुष होतात. 

पण ही भारी फॅशन आहे बरं का. आणि मी आधी नमुद केल्याप्रमाणे फॅशन ही अनेक प्रकारची आहे बरं का. यात वयोमर्यादा, लिंगभेद, भाषेची देखील मर्यादा नाही किंवा कोणती फॅशन या विषयाला कोणतीही मर्यादा नाही हं. 

हं तर आजचा आपला विषय आहे पावरी हाहा, अहो मला पार्टीच म्हणायचे होते. ते ओघाओघात तोंडून पावरी आलं पहा. 

तर या पावरी व्हिडिओची फॅशन मधल्या काही काळात जणू थैमान घालत होती. जो येईल तो, ज्याला जमेल तसं पार्टीचे आयोजन करुन आपला उत्साह वाढवुन हा व्हिडिओ बनविण्यासाठी प्रयत्न करत होता. शिवाय सोशल मीडियावर एकमेकांना टॅग करुन हा व्हिडिओ शेअर करत असत. 

अहो आता काय सांगू कधीही आमच्या लग्नाच्या वाढ दिवसाची तारीख लक्षात न राहणारे आमचे हे, चक्क आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त काही परीवारातील सदस्यांना बोलाऊन, अगदी त्या दिवशी स्वतः सर्व आयोजन करुन जणू फॅशन प्रमाणे वागायचे म्हणून हा व्हिडिओ बनवून आमच्या मुलांना पाठवत होते. मला तर बाई आश्चर्य वाटले आणि गंमत देखील वाटली.

मग काय आमच्या आई वडीलांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा म्हणून ते ज्या देशात होते, तिथल्या सहकार्यांना घरी बोलवुन तिथे देखील हा उत्साह साजरा केला. आणि हो त्यांनी पण इंग्रजी भाषेत व्हिडिओ बनवून पाठवला. 'This is me, these are my friends, we are celebrating our parent's anniversary and our PAWRI is going on'

या पावरीच्या व्हिडिओची फॅशन इतकी प्रचलित झाली की कोणत्याही समारंभात, लग्न समारंभ असो की बारसे असो, सणासुदिचे दिवस असो की प्रमोशन असो. अशी पावरी हो हो तेच ते पार्टी करत व्हिडिओ बनवून आपला आनंद पसरावायचा. 

दिवाळीच्या वेळी तर चक्क तरुण पिढीतील मुली, अहो आजकाल मुलीच काय पण मुलं देखील पुढे येऊन फराळ बनवायला मदत करणातात. आणि मग एकमेकांना चिडवत व्हिडिओ बनवतात. 'ही माझी बहीण आहे, हा तिने बनविलेला लाडु आहे आणि तो खाण्यासाठी आम्ही हातोडा घेऊन पावरी करणार आहोत.'

एकदा तर एका लग्नाच्या समारंभात सगळे अगदी पटापट आवरून, हो चक्क सगळ्या बायका, पुरुष इतकेच काय पण तरुण पिढीतील मुलं, मुली, लहानगे या व्हिडिओसाठी एकत्र आले आणि इतके मग तो परफेक्ट बनविण्यासाठी जे मग्न होऊन गेले की  लग्नमंडपातुन गुरुजी म्हणाले चला आता मुहूर्तावर लग्न लावून मग काय ती तुमची पावरी बिवरी करा.

तर एकीकडे काॅलेज मधील मजा तर वेगळीच बरका. रीझल्ट लागो अथवा न लागो. नंतर मार्क्स कसे मिळतील याचं टेन्शन न घेता आधीच मिसळीचा आस्वाद घेत हे आपली पार्टी सुरू करतात. 'ये हम है, ये हमारा मिसळ पाव है और हमारी पावरी हो रही है '

असं म्हणत मग सकारात्मक विचार करून रीझल्ट पहण्याचे ठरवतात.

गंमत म्हणजे आमच्या सोसायटीत एक वयस्कर आजी आजोबा राहतात. तर चक्क आजोबांच्या वाढदिवसानिमित्त आजींनी सोसायटी मधील त्यांचे समवयस्क मित्र मंडळीना बोलावले. बरं आधी अगदी छान आपल्या पद्धतीनुसार आजोबांना काही बायकांनी ओवाळले. या वयात कसली भेटवस्तू आणि कसलं काय. आजींनी आधीच सांगितले होते सगळ्यांना, 'भेटवस्तुचे जे काही पैसै असतील ते आपण छान गरजु संस्थेला दान करुयात'. सगळ्यांनी याला दुजोरा देखील दिला. त्याप्रमाणे एक ठराविक रक्कम गोळा करून त्यानुसार पाकिट तयार केले. 

पण हां आता आजींचा आग्रह की यांचा व्हिडीओ बनवून लगेच तो सोशल मीडियावर टाकला जावा. आजींनी खणखणीत आवाजात ए चला ग सगळे ते काय ते आजकालच्या फॅशनप्रमाणे आपण पण मस्त व्हिडिओ बनवून टाकु की फेसबुकवर. मग काय लगेच त्यांनी त्या ठिकाणी जमलेल्या आप्तेष्टांना एकत्र करून, सगळे एकत्र फ्रेम येत आहेत की नाही हे पाहून एका तरुण पिढीतील व्यक्तीला बोलावले. सर्व जण मिळून एका सुरात म्हणू लागले, 'ये हम है, ये मेरे अहो है, और  इनके नामसे जो दान करेंगे, उनकी पावरी हो जाएगी, आणि लाईफ बन जाएगी'|

कसली मस्त फॅशन आहे ना ही.

खरंच पण ही फॅशन संभाळत आपणच आपल्या समाजाचे भान ठेवून समाजासाठी काहीतरी करु शकलो तर त्याचे महत्व आणि समाधान काही वेगळेच आहे. असं मला अगदी मनापासून वाटतं.

एकुण काय तर आपण आपले वय, भाषा, इत्यादी इत्यादी गोष्टी विसरून एकत्र येऊन हे आयुष्य उत्साहवर्धक बनवणे किंवा बनवायला शिकणे.


मी सौंदर्यवती (२मीरर मीरर)

 लहानपणापासून सगळ्याच मुलींना सौंदर्यवती होण्याची इच्छा असते. "Mirror mirror on the Wall"... असे प्रत्येक मुलगी आरश्यात बघून म्हणत असते. आणि त्यात काही वावगं पण नाही हं. कारण देवाने जे रुप दिले आहे, ते सुंदरच आहे, असे प्रत्येकीचे ठाम मत आहे. आणि काय चुकीचे आहे हो त्यात. खरंच आहे. कोणी दिसायला, तर कोणी वागायला, कोणी बोलायला, तर कोणी मनाने, असे एक ना अनेक गुण प्रत्येक व्यक्ती मध्ये असतात. फक्त ते ओळखून आपणच आपले सौंदर्य जपायचे असते, त्याचे जतन करायचे असते.  

आणि खरं तर आपल्याला एखाद्या विशिष्ट क्षेत्रात पाऊल पुढे टाकायची इच्छा असेल तर आपण त्या प्रमाणे त्या क्षेत्रात जे जाणतात, त्यांच्याकडे जाऊन त्यांचे मार्गदर्शन घेणे केव्हाही चांगले आणि शहाणपणाचे ठरेल. आपल्या आजूबाजूलाच किती वेळा कसे तज्ञ किंवा योग्य सल्ला देणारी व्यक्ती असते. ते आपणास वेळोवेळी मार्गदर्शन करु शकतात. पण त्या करता आपल्याला देखील तशी मानसिकता असावी, हे ही तेव्हढेच आवश्यक असते. नाही तर समोरचा योग्य दिशा दाखवायला तयार आहे, पण आपल्याला त्याची जाणीवच नसेल तर काय उपयोग. हं तसं म्हटलं तर आजकालच्या काळा फुकटचे सल्ले देणारे किंवा स्वतःला बऱ्याचदा अनेक विषयांमध्ये तज्ञ समजणारे देखील बरेच असतात म्हणा. नाही असं नाही. पण म्हणून तर मग योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्ती ओळखुन आणि गरज पडेल त्यानुसार त्या व्यक्तीचे सल्ले घेणे योग्य की. शिवाय बदलत्या काळानुसार आपल्यामध्ये देखील योग्य बदल घडवणे गरजेचे असते. 

आपले सौंदर्य आपणच जपून ठेवायचं असतं. आणि सौंदर्य म्हणजे नुसते दिसायला चांगले आहे, असे नाही. तर दिसण्याबरोबरच आपले रहाणे, वागणे बोलणे कसे असावे, याचाही नक्कीच विचार करता आला पाहिजे. एवढेच नव्हे तर आपण किती योग्य श्रोते आहोत हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे बरका. नाही तर समोरचा योग्य सल्ला देतील, तसे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न सुद्धा करतील.  पण ते आपल्याला ऐकायचं नसेल, ते आत्मसात करून घेण्याची गरज वाटत नसेल तर काय उपयोग. हो मला माहीत आहे, "ऐकावे जनाचे पण करावे मनाचे". ही जरी प्रसिद्ध म्हण असली, तरीही देखील अनेक वेळा आपल्या पेक्षा वयस्कर मंडळी किंवा अनुभवी व्यक्ती आजुबाजुला असतील. शिवाय त्यांनी त्यांच्या अनुभवातून शिकुन दुसऱ्याने ती चुक करु नये, या कळकळीने जर आपणास सक्षम बनविण्यासाठी काही सांगत असतील तर त्याचे महत्व लक्षात घेऊन त्यानुसार आपण देखील आपल्यामध्ये बदल नक्कीच घडवून आणू शकतो की. 

आपण नोकरी करत असु, तर तिथे कोणत्या प्रकारचे पेहराव आवश्यक आहे, त्या नुसार आपली केशरचना आहे का, आपण हातात काय घेऊन जातो, म्हणजे साधी पर्स की छान बॅग घेऊन जातो. आपला मेक अप तसा आहे का. कारण जग तुमच्या कडे पहात असतं. मला माहीत आहे या सगळ्या गोष्टी वाचताना किंवा ऐकताना छोट्या गोष्टी वाटतात. पण या सर्व गोष्टी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी मदत करत असतात. आणि अनेक वेळा म्हणतात ना की "First Impression is Last Impression"... तर त्यामुळे आपणच ठरवायचं असतं आपली प्रतिमा कशी असली पाहिजे.  

या सर्व गोष्टींसाठी खूप खर्च करावा लागतो असंही नसतं बरका. आपल्या आजुबाजुला नजर टाकली तर लक्षात येईल की हे सर्व कमी खर्चात देखील अगदी सहज शक्य आहे. 

थोडक्यात उदाहरण द्यायचे झाले तर दोन अगदी समान कंपनीचे दुकान शेजारी शेजारी आहे. पण एका दुकानातील वस्तूंवर धुळ लागली आहे आणि दुसरीकडे मात्र त्याच वस्तू छान चमकदार आहेत, व्यवस्थित मांडून ठेवल्या आहेत, पुसुन ठेवल्या आहेत. आपण नक्कीच स्वच्छ ठीकाणी जाऊ. हो की नाही.

आणि सांगायचे झाले तर त्याच दुकानातील व्यक्ती आणि त्यांचे बोलणे कसे आहे हे देखील आपण नेहमी ऐकतो. ती व्यक्ती योग्य भाषा बोलत असेल तर आपण अनेकदा वस्तू नको असेल तरी अगं त्या दुकानदाराने इतक्या आपुलकीने स्वागत केले आणि छान चौकशी केली. हे करताना ही वस्तू कशी योग्य आहे, हे इतकं छान सजवून सांगितले ना की मी  मोहुन ती वस्तु खरेदी करून घरी आले. मग लक्षात येतं की आपण उगाच मोहात पडलो काही घेण्याच्या. घरी आल्यावर मात्र हीच वस्तू आपल्याकडे होती हे लक्षात आल्यावर, चला बाई त्यानिमित्ताने माझ्याकडे आता याची जोडी झाली आहे असं म्हणत स्वतःचं आत्मसमर्थन करत बसतो. आणि ती वस्तु खरेदी करून आपण तर काय बाबा चुक केली नाही असं मनात आणून स्वतःचं समाधान करत बसतो.

थोडक्यात काय तर आपण देखील आपल्या सौंदर्याला तितकेच महत्व देणे आवश्यक आहे. आपणच आपला योग्य बदल घडवणे गरजेचे आहे. आपला मान आपणच ठरवायचे गरजेचे असते. इतरांशी स्पर्धा करण्याच्या दृष्टीने कधीच कुठले पाऊल उचलणे गरजेचे नसते. कारण त्याने किंवा तिने काय घातले आहे, काय खरेदी केले आहे, हे ज्याचे त्याचे वैयक्तिक पातळीवर अवलंबून असते. 

आपण म्हणतो ना "अंथरूण पाहून पाय पसरावे". ते खरंच आहे. आपल्या गरजेनुसार योग्य क्रम लावून, त्याची असणारी आवश्यकता लक्षात घेऊन त्यानुसार आपली परिस्थिती देखील लक्षात घेऊन पाऊल उचलले केंव्हाही आवश्यक असते. कारण एकतर प्रत्येक व्यक्तीच्या गरजा आणि ते पूर्ण करण्यासाठी लागणारी क्षमता वेगवेगळी असते. हे ओळखून असणे गरजेचे आहे. दुसऱ्या कोणत्याही व्यक्ती बरोबर स्पर्धा करण्याच्या नादात आपण कित्येक वेळा आपले अस्तित्व टिकवून ठेऊ शकत नाही. आपण स्वतःला हरवून बसतो. आपले स्थान निर्माण करायचे असेल तर आपण आपल्या स्वतःची स्पर्धा करावी लागते.  

या सर्व गोष्टी लक्षात ठेऊन आपण आपली प्रतिमा कशी असावी, या गोष्टी कडे वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन बदल घडवत राहणे आवश्यक असते. 

वेळेचा सदुपयोग करून आणि खर्चाचा अंदाज घेत आपण दिनचर्येत थोडासा बदल घडवणे नक्कीच समाधानकारक आहे. 

त्या प्रमाणे योग्य शारीरिक व मानसिक दृष्ट्या आपणास सक्षम बनवणे गरजेचे असते. योग्य तो व्यायाम, योग्य वेळी करणे. त्या प्रमाणे आहारात बदल घडवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. वेळेचे व्यवस्थित नियोजन करून आपल्या मधील बदल घडवणे खूप आवश्यक असते.  

आणि हो आजच्या काळातील फॅशन करणे म्हणजे कपडे कसेही घालणं, उगीच मॉडर्न बनण्याच्या नादात हसु बनुन राहीलेले बिलकुल छान नाही हं. 

अहो आपल्या भारतीय पेहरावात देखील तितकाच ग्रेस आहे. 

तर मग करुयात का हे छोटे छोटे बदल आपल्या मधील. आणि मग दाखवून देऊयात जगाला हम भी किसी से कम नहीं. 



सौ अर्चना शिशिर दीक्षित 

९९६९८५८९३९

मी सौंदर्यवती (१रील)

 "Oh my God, Oh my  God, Oh my God, I am so Beautiful"... असा एक Reel आजकाल खूपच प्रचलित आहे. आणि आपण देखील असा रेकाॅर्डेड व्हिडिओ बनवून आणि मस्त मस्त तयार होऊन, छान आजकालच्या काळजी जणू गरज आहे, असं समजत,  "पेंडींग है, जो ट्रेंडीग है," असं म्हणत हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत असतो. आणि मग वाट पहातो, किती लाईक्स आणि काॅमेंट येतात याची. मग आपले वय काहीही असो. आजकालच्या फॅशन विषयावर आपण कमी नको पडायला. तसेच ट्रेंड्स प्रमाणे वागायला लागतो. 

मला विचाराल तर यात काही चुकीचं नाही बरका. कारण फॅशन कोणी करायची आणि कोणी करायची नाही, असा काही नियम नाही. किंवा फॅशनला काही मर्यादा देखील नाहीत. 

हा विषय तसा म्हटला तर खूप गहन आहे हो. 

कधी वेगवेगळ्या रंगांचे कपडे घालून आपल्याकडे महीला वर्ग तयार होतो. उदाहरण द्यायचे झाले तर नवरात्रात प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगांचे कपडे किंवा साड्या नेसून स्त्रिया सुंदर तयार होतात. यामागे कधी काही ठराविक कारणं आहेत तर कधी निव्वळ स्वतःला आनंद मिळावा, असेही कारण असते बरका या फॅशनची. 

आता सांगायचे झाले तर या दिवसात महीला नाही तर तरुण पिढीतील मुली सुद्धा उपवास करतात. मग अशा वेळी स्वतःला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणा किंवा आपल्या बरोबर सर्वांना या रंगात रंगून जाता यावे, हा उद्देश असतो. मग यांची तयारी बऱ्याच दिवसांपासून सुरू असते. नऊ दिवस कोणकोणत्या रंगाची साडी किंवा पंजाबी ड्रेस घालायचे, हे ठरवले जाते. अगदी जगाच्या पाठीवर कुठेही राहो मग. या दहा दिवसात हेच सर्व रंग आपल्याला नजरेत पडतात. हे विविध रंग छान उत्साह वर्धक असतात.  एवढेच काय पण मुली आणि महिलांना पाहून तर आजकालच्या पुरुषांना देखील आपण पण अशी फॅशन करावी, असे वाटते. असं करुन ते आपल्या बायकोला किंवा मैत्रिणीला इंप्रेस करतात हं. 

आणि मग घरी किंवा ऑफिसमध्ये जाऊन काम संपत आले की सामुदायिक फोटो किंवा सामुदायिक व्हिडीओ बनवून लगेच तो सोशल मीडियावर टाकत आणि हॅशटॅग करत आपलाच उत्साह वाढतात. हे इथेच संपत नाही, तर या दिवसात वृत्तपत्रात फोटोजचे एक आख्खे पान या उत्साहाला प्रोत्साहन देण्यासाठी असते. त्या निमित्ताने काही वृत्तपत्रे तर छान छान स्पर्धा देखील आयोजित करण्यात पुढाकार घेऊन महिलांना खूप खुष करतात. शिवाय टिव्ही वरील मालिकेत देखील त्या काळात तेच वातावरण निर्माण करुन त्या त्या रंगांनी मालिकेत रंग भरतात. या सगळ्यात उद्देश काय तर उपवासाचे दडपण न राहता आनंद पसरावा.

अहो पण आश्चर्य या गोष्टीचे वाटते की एवढेच काय पण आपल्या देशात मर्यादित न राहता ही फॅशन सर्व जगभर प्रसिद्ध होत असते. विविध देशांतील आपले भारतीय पेहराव त्या निमित्ताने प्रसिद्धीस आले आहे. अनेक वेळा तर आपले बाहेरच्या देशात राहणारे भारतीय पेहरावात दिसतात आणि भारतात मात्र वेस्टर्न आऊटफिट मधे दिसतात. पण हां रंग मात्र अगदी सेम पिंच बरका. पण मी काय म्हणतेय , ठिक आहे ना. काय बिघडले भारतीय की वेस्टर्न. आपली प्रतिमा आणि मर्यादा लक्षात घेऊन त्यानुसार काही फॅशन केली तर काय हरकत आहे? संस्कृती जपणे, जेणेकरून, ते महत्त्वाचे. हो की नाही? अय्या हे रंग कसले भारी व्हायब्रंट आहेत. मज्जा येते तशी कपड्यांची खरेदी करून घालायला, असं म्हणत का होईना पण तरुण पिढीतील मुली सुद्धा या फॅशनमध्ये उत्साहाने सहभागी होताना दिसत असतात.

आणि हो गंमत म्हणजे यांच्या या वेगवेगळ्या रंगांचे कपडे बाजारात पण लगेच उपलब्ध असतात. जणू या ठरलेल्या रंगाची यादी दुकानदाराकडे आधीपासूनच असते. त्या प्रमाणे त्या काळात दुकानातील कपडे देखील त्याच विविध छटांचे असतात. अहो साडी किंवा पंजाबी ड्रेस काय आजकाल तर वेस्टर्न आऊटफिट सुद्धा विविध रंगांचे आहेत. त्यामुळे तरूण मुली सुद्धा या फॅशनमध्ये उत्साहाने सहभागी होताना दिसत असतात. 

यात भरीस भर म्हणून खाण्याच्या पदार्थांना देखील नवीन रंग प्राप्त होतात. लाल रंग ज्या दिवशी त्या दिवशी बिटरुट कटलेट, हिरव्या रंगाची पुरी, असे एक ना अनेक पदार्थ बनवायला लागतात.

हं तर मग अशी आहे  रंगांच्या फॅशनची कहाणी. बघुयात अजून कशा कशाची फॅशन येते आणि आपल्याला काय काय शिकवते ते. 


सौ अर्चना शिशिर दीक्षित

९९६९८५८९३९